Breking News
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील विकासकामांची केली पाहणीस्वतःचे व्हिजन ठेवा, सद्विवेकाला फॉलो करा! – तुकाराम मुंढे यांचे ‘जेन झी’ला आवाहनसाखर उद्योग ‘मल्टीप्रॉडक्ट बायोमास रिसोर्स’ म्हणून विकसित व्हावादेशाला विश्वगुरू बनवण्यासाठी वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे : सरसंघचालक डाॅ. मोहन भागवतपहिल्या टप्यात पुणे जिल्ह्यातील ३८ हजार ९७० शेतकऱ्यांची कर्जमुक्ती; ३४५.२५ कोटीचा दिलासापुण्यात पीएमपी बसच्या धडकेत दोन महिलांचा मृत्यूज्येष्ठ नागरिकाची ४ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूककेंद्रीय अर्थमंत्र्यांच्या ‘डीपफेक व्हिडीओद्वारे फसवणुकगाेळीबार करुन २२ तोळ्यांच्या दागिन्यांची लुटनदीपात्रात नवजात अर्भक मृतावस्थेत सापडले

रिक्षा चालकाने प्रवासी तरुणी धमकावून लुटले

Sahakarnagar gang terror

बंडगार्डन मेट्रो स्थानक परिसरातील घटना

marathinews24.com

पुणे – रिक्षा चालकाने प्रवासी तरुणी आणि तिच्या मित्राला धमकावून रोकड, मोबाइल संच असा २३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लुटून नेल्याची घटना बंडगार्डन मेट्रो स्थानक परिसरात घडली. याबाबत तरुणीने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार रिक्षा चालकासह दोन साथीदारांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला.

बसच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार १९ वर्षीय तरुणी मूळची बिहारची आहे. तरुणी आणि तिचा मित्र पुणे रेल्वे स्थानक परिसरात उतरले. गुरुवारी (२२ जानेवारी) पहाटे सव्वापाचच्या सुमारास तरुणी आणि तिचा मित्र रिक्षातून बंडगार्डन रस्त्याने निघाले होते. बंडगार्डन मेट्रो स्थानकाजवळ रिक्षाचालकाने रिक्षा थांबविली. रिक्षाचालक आणि साथीदारांनी तरुणी आणि तिच्या बरोबर असलेल्या मित्राला धमकाविले. त्यांच्याकडील साडेतीन हजारांची रोकड, मोबाइल संच असा ऐवज लुटून रिक्षाचालक पसार झाला. या घटनेनंतर घाबरलेल्या तरुणीने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलीस कर्मचारी जढर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×