Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

वाघोलीत घरातून पावणेतीन लाखांचे दागिने चोरीला

भांड्याचा वाद जीवावर बेतला, दाम्पत्याने केला खून

वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – घराची बनावट चावी बनवून चोरट्यांनी २ लाख ६४ हजारांचे दागिने चोरून नेल्याची घटना २७ जानेवारीला केसनंद रोड वाघोलीत घडली आहे. याप्रकरणी तरूणाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रकच्या धडकेत सायलस्वार जेष्ठ नागरिकाचा मृत्यू – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे वाघोलीतील केसनंद रोडजवळील जे.जे. नगरात राहायला आहेत.२७ जानेवारीला त्यांचे घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी बनावट चावीने घर उघडले. कपाटातील २ लाख ६४ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सिद्धनाथ शेंडगे तपास करीत आहेत.

येवलेवाडीत घरफोडी, दोन लाखांचे दागिने चोरीला

बंद फ्लॅटचे कुलूप तोडून १ लाख ९२ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले आहेत. ही घटना २६ ते २७ जानेवारीला येवलेवाडीतील पानसरेनगरात घडली आहे. याप्रकरणी येवलेवाडीत राहणार्‍या ३३ वर्षीय तरूणाने येवलेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कुटूंबियासह येवलेवाडीतील पानसरेनगरात राहायला आहेत.२६ ते २७ जानेवारी कालावधीत ते घर बंद करून गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरातील कपाटातून १ लाख ९२ हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. तक्रारदार बाहेरून आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील तपास करीत आहेत.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top
×