Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

रंगकाम करताना तोल जाऊन पडल्याने कामगाराचा मृत्यू

विश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खून

दुर्धटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी ठेकेदाराविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – रंगकाम करताना तोल जाऊन पडल्याने कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना तळजाई परिसरात घडली. दुर्घटनेस जबाबदार ठरल्या प्रकरणी ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक दशरथ डेंगळे (वय ४९, रा. टिळेकनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) असे मृत्यूमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत डेंगळे यांचा मुलगा अमर (वय २३) याने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती, मुलाला जिवे मारण्याची धमकी देऊन महिलेवर बलात्कार – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक डेंगळे हे शुक्रवारी (३० जानेवारी) दुपारी साडेबाराच्या सुमारास तळजाई परिसरातील गायत्री सोसायटीत रंगकाम करत होते. तेथे लाकडी पाळण्याचा वापर करुन ते इमारतीला रंग लावत होते. त्या वेळी अशोक यांचा तोल गेला. तोल जाऊन पडल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.
ठेकेदाराने सुरक्षाविषयक साधने न पुरविल्याने दुर्घटना घडल्याचे डेंगळे यांचा मुलगा अमर याने फिर्यादीत म्हटले आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक सोनाली मिठारे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×