Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

तरुणीचा विवाह मोडणाऱ्या प्रियकराला अटक

गुंड सुरज ठोंबरे टोळीतील सराईत अटकेत, पिस्तूल जप्त

होणाऱ्या पतीला छायाचित्रे पाठविली

marathinews24.com

पुणे – प्रेमसंबंध तोडल्याने तरुणी, तसेच तिच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी देऊन होणाऱ्या पतीला छायाचित्रे पाठवून विवाह मोडल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी येरवड्यातील लक्ष्मीनगर पोलिसांनी तरुणाला अटक केली. इम्रान रहमान शेख (वय २२, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत २१ वर्षाच्या तरुणीने लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीचे आरोपी इम्रान शेख याच्यााशी चार वर्ष प्रेमसंबध होते. तरुणीच्या कुटुंबीयांनी तिचा विवाह ठरविला. त्यामुले तरुणीने त्याला प्रेमसंबंध ठेवू नको, माझा विवाह ठरला आहे, असे शेखला सांगितले. त्यानंतर शेखने तरुणीला शिवीगाळ करुन धमकावले. ‘तुझा विवाह जमू देणार नाही. तुझ्या कुटुंबीयाचा खून करेल’, अशी धमकी दिली.

आरोपीने तरुणीच्या आईला तीक्ष्ण शस्त्राचा धाक दाखवून तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर आरोपी शेखने तरुणीचा ज्याच्याशी विवाह ठरला होता. त्याला प्रेमसंबंधाची छायाचित्रे पाठविली. नियोजित पतीने विवाह मोडला. घटनेनंतर तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक जगताप तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×