Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

बसप्रवासात चोऱ्या करणाऱ्याचा उच्छाद

एसटी प्रवासी महिलेचे साडेचार लाखांचे दागिने चोरी

दोन घटनांमध्ये सव्वा पाच लाखांचा ऐवज लांबविला

marathinews24.com

पुणे – पीएमपी तसेच खासगी व शासकीय बसमध्ये चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद घातला असून, दोन घटनांमध्ये तब्बल सव्वा पाच लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुलावरील प्रवास करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील तब्बल २ लाख ९५ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. तर, दुसऱ्या घटनेत प्रवासादरम्यान महिलेच्या पिशवीतून २ लाख ३५ हजारांचा ऐवज चोरला आहे.

येवलेवाडी अन मुंढव्यात ४६ लाखांची घरफोडी – सविस्तर बातमी 

पहिल्या घटनेत ५३ वर्षीय महिलेने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञाताविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तक्रारदार या कुंभारवाडी येथील आहेत. त्या मनपा येथून पीएमपी बसने प्रवास करत होत्या. बसमध्ये गर्दी होती. यादरम्यान, चोरट्यांनी गर्दीतून त्यांच्या गळ्यातील २ लाख ९५ हजारांचे मंगळसूत्र चोरून नेले. काही वेळातच हा प्रकार तक्रारदारांच्या लक्षात आला. पण, चोरट्याने पोबारा केला होता.

दुसऱ्या घटनेत सिंहगड रोड पोलिस ठाण्यात ७३ वर्षीय ज्येष्ठाने तक्रार दिली आहे. माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ हे सिंहगड रोडवरील हिंगणे भागात राहतात. ते नाशिक येथे गेल्या होत्या. ५ फेब्रुवारी रोजी ते नाशिक येथील ठक्कर बाजार बसस्थानकातून पुण्याकडे निघाले. त्यांनी पिशवीत २ लाख ३५ हजार रुपयांचे दागिने ठेवले होते. वाकडेवाडी एसटी स्थानकात उतरल्यानंतर तेथून ते घरी आले. त्यांनी पिशवीची पाहणी केली असता त्यांना पिशवीतून दागिने चोरीला गेल्याचे दिसून आले. पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×