Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ फेब्रुवारीला

आरोपीना डिजिटल पुरावे देण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढीची मागणी

विष्णू चाटेला बीडच्या कारागृहात हालवण्याची आरोपीच्या वकिलांची मागणी

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – जिल्ह्यातील मस्साजोगचे दिवंगत संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी दि. ७ फेब्रुवारीला बीड येथील विशेष मकोका न्यायालयात पार पडली. या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेच्या वकिलाने कारागृह बदलण्याबाबत याच्या अगोदर अर्ज केला होता मात्र तो अर्ज न्यायालयाने रद्द केल्यामुळे विष्णू चाटेच्या वकिलांकडून परत एकदा न्यायालयाकडे अर्ज करण्यात आला, त्यामुळे तोच निर्णय अंतिम समजला जावा असा युक्तिवाद करण्यात आला, यावर न्यायालयाचा निर्णय येणे अपेक्षित आहे. तर सरकारी पक्षाकडून अतिरिक्त दाखल करण्यात आलेला लॅपटॉप पुरावा आणि तपासणी अहवाल न्यायालयात जमा करण्याबाबत माहिती देण्यात आली. त्याची कॉपी आरोपीच्या वकिलांना मिळाल्यानंतर आता पुढील सुनावणी २१ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

समाजात विधायक काम करणारे दुर्लक्षित-निवृत्त न्यायमूर्ती अभय ओक – सविस्तर बातमी

आरोपीच्या वकिलांकडून न्यायालयात सुनावणी दरम्यान युक्तिवाद करण्यात आला. या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे हा सध्या लातूर कारागृहात आहे. तेथून त्याला बीडच्या कारागृहात आणण्यात यावे, यासाठी वकिलांनी युक्तिवाद केला. आता या प्रकरणाची ट्रायल सुरू होणार असून तत्पूर्वी विष्णू चाटेला बीड कारागृहात आणण्यात यावे अशी मागणी आरोपीच्या वकिलांनी केली, त्याला विरोध करत सरकारी वकिलांनी आक्षेप घेतला, केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती, त्या प्रकरणाची सुनावणी दि. ७ फेब्रुवारी रोजी बीड येथील विशेष मकोका न्यायालयात न्या. व्यकटेश पाटवट्कर यांच्यासमोर सुरु आहे. शनिवारी झालेल्या सुनावणीत विष्णु चाटे याचे वकील सचिन शेप, राहुल मुंडे व कुलकर्णी यांनी युक्तीवाद केला, तर सरकारी पक्षाकडून ॲड. उज्वल निकम यांनी व्हीसीद्वारे तर बाळासाहेब कोल्हे यांनी न्यायालयात उपस्थित राहून युक्तीवाद केला. यावेळी विष्णु चाटे याला बीड न्यायालयात आणण्यात यावे या मागणीच्या अर्जावर युक्तीवाद झाला.

ॲड कुलकर्णी यांनी विष्णु चाटे याच्या मागणीवर न्यायालयाने विचार करावा व वकिलांशी त्याचा थेट संवाद व्हावा तसेच न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान उपस्थित राहता यावे याकरिता बीड कारागृहात हलवण्यात यावे असा युक्तीवाद केला. तसेच लातूर येथून विष्णु चाटे याला बीडला आणायाचे असेल तर या दरम्यान मस्साजोग हे गाव असून त्या ठिकाणाहून आरोपीला आणतांना काही अप्रिय घटना घडू शकते, असे देखील आरोपीच्या वकिलांनी नमुद केले आहे .दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या २१ फेब्रुवारीला होणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×