एकदिवसीय साहसी पर्यटनाकरिता एमटीडीसीच्यावतीने टूरपॅकेज जाहीर

एका दिवसात साहस, निसर्ग आणि मजा – एमटीडीसीचे खास टूरपॅकेज जाहीर

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने १४, १५, २१, २२ आणि २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सातारा जिल्ह्यातील मुनावळे बोट क्लब परिसरात नव्या स्वरूपातील एकदिवसीय साहसी पर्यटनाकरिता टूरपॅकेज पर्यटकांसाठी जाहीर करण्यात आले आहे.

बाबा हरनाम सिंघ जी यांच्या हस्ते आरम्भता की ‘अरदास’ संपन्न – सविस्तर बातमी

निसर्गसौंदर्य, इतिहास आणि थरारक साहसी उपक्रम यांचा सुरेख संगम साधणारे हे पॅकेज फक्त ३ हजार २०० प्रति व्यक्ती या विशेष दरात उपलब्ध असून, एका दिवसात अविस्मरणीय पर्यटन अनुभव देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. या पॅकेजमध्ये एसी बसने प्रवास, पुणे-मुनावळे-पुणे, बारा मोटेची विहीर- ऐतिहासिक बावडी दर्शन, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मुनावळे बोट क्लब येथे ४ थरारक वॉटर राईड्स- जेट स्की , बनाना राईड , व्हर्लपूल राईड व बम्पर राईड, शेंबडी मठ दर्शन, निसर्गरम्य तलाव परिसर, छायाचित्रे व रिलॅक्सेशन टाइम, स्वादिष्ट नाश्ता, शाकाहारी व मासांहरी जेवण व हाय-टी, अनुभवी सहल व्यवस्थापक, प्रथमोपचार संच, दूर मॅनेजर, सुरक्षित गिअर आदी सुविधा आहेत.

सहलीचे एमटीडीसी, सेंट्रल बिल्डिंग पुणे येथून सकाळी ६ वाजता प्रस्थान होणार असून, दिवसभरात ऐतिहासिक स्थळे, निसर्गरम्य परिसर, साहसी उपक्रम आणि आरामदायी वेळ असा परिपूर्ण अनुभव पर्यटकांना मिळणार आहे, शेवटी रात्री ८ वा. पुणे येथे येणार आहे.

या सहलीचा आनंद घेण्यासाठी कुटुंब, मित्रमंडळी, युवक व साहसी पर्यटनप्रेमींसाठी ही एक उत्तम संधी असून, जागा मर्यादित असून जागेचे आरक्षण व अधिक माहितीसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, प्रादेशिक कार्यालय, पुणे आय बॅरॅक, सेंट्रल बिल्डिंग, ससून रुग्णालयाजवळ, पुणे-०१, तसेच दिपाली गुजर-९६८९१३६७९१, सिद्धेश तुंगलकर- ७७९६५९०३७५, गोविंद खवणेकर-८२७५६७७६१९ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक हनुमंत हेडे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×