इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या योजनांसाठी अर्जास मुदतवाढ

पात्र विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृह व शैक्षणिक योजनांचा लाभ घेण्याची संधी

marathinews24.com

पुणे – सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, पुणे यांच्या मार्फत इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शासकीय वसतिगृह, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेअंतर्गत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

प्रभाग ९ मधील मिसिंग लिंकबाबत चंद्रकांतदादा पाटील ॲक्शन मोडवर – सविस्तर बातमी

काही जिल्ह्यांतील वसतिगृहांमध्ये जागा रिक्त राहिल्याने प्रथम वर्षातील पात्र विद्यार्थ्यांना संधी देण्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली असून, ऑनलाईन वसतिगृह प्रवेश प्रणालीद्वारे अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच पहिल्या निवड यादीनुसार प्रवेशाची अंतिम मुदत २६ फेब्रुवारी २०२६ निश्चित करण्यात आली आहे.

१२ वी नंतर बी.ए., बी.कॉम., बी.एससी. तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या योजना लागू आहेत. पात्र विद्यार्थ्यांनी मुदतवाढीचा लाभ घेऊन अर्ज सादर करावा, असे आवाहन सहायक संचालक प्रदीप संकपाळ यांनी केले आहे.

अर्जासंबंधी अधिक माहितीसाठी सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, पुणे कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सर्व्हे नं. १०४/१०५, येरवडा पोलीस स्टेशनसमोर, विश्रांतवाडी, पुणे-६ येथे संपर्क साधावा किंवा अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×