Breking News
फुलेप्रेमी कवीच्या कुटुंबाला तीन लाखांची आर्थिक मदतपुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

पुणे महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट 

पुणे शहराच्या पायाभूत व नागरी विकास प्रकल्पांना गती देण्याबाबत सकारात्मक चर्चा

marathinews24.com

पुणे – महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर आणि गटनेते गणेश बिडकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. भेटीदरम्यान पुणे शहराच्या विकासाशी संबंधित विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुलजी नार्वेकर, महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

‘हिंद दी चादर’ शहिदी समागमासाठी प्रशासन सज्ज – सविस्तर बातमी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारकडून पूर्ण सहकार्य देण्याची ग्वाही दिली. पायाभूत सुविधा, नागरी सुविधा, वाहतूक व्यवस्था तसेच प्रस्तावित विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी आवश्यक ती मदत करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी रिपब्लिकन पक्षाचे पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, राज्य सचिव बाळासाहेब जानराव, भाजपचे दीपक नागपुरे उपस्थित होते. या भेटीमुळे पुणे शहराच्या विकासाला नवे बळ मिळेल, असा विश्वास नवनिर्वाचित महापौर व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×