Breking News
टँकरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यूरॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न

वाहतूक विभागाकडून पुणेकरांची फिरकी

वाहतूक विभागाकडून पुणेकरांची फिरकी

बक्षिसाच्या नावाखाली पावणेचार कोटींची दंडवसुली

marathinews24.com

पुणे – वाहतूक विभागाने पुणेकरांची चांगलीच फिरकी घेतली असून, नागरिकांना ५० हजार रूपयांच्या बक्षिसाचे आमिष दाखवून तब्बल पावणेचार कोटींची दंडवसुली केली आहे. कधी नव्हे ती दंडवसुली एका झटक्यात झाल्यामुळे वाहतूक विभागाच्या फिरकीने नागरिकही अवाक झाले आहे. पीटीपी अ‍ॅपद्वारे नागरिकांना बेशिस्त वाहन चालकांचा फोटो अपलोड करण्यास सांगितले होते. बक्षिसाची रक्कम आपल्याला मिळेल याच अपेक्षाने अनेकांनी बेशिस्तांचे फोटो कॅप्चर केले. मात्र, तत्पुर्वीच त्याच नागरिकांकडून दंडवसुली करीत वाहतूक विभागाने कार्यभाग साधला आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६च्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री यांनी घेतली विधानपरिषद सभापती व उपसभापतींची भेट – सविस्तर बातमी 

आम्ही बेशिस्तांविरूद्ध सातत्याने कारवाई करत असून, त्यामध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन वाहतूक विभागाने केले. त्यासाठी विभागाने नामी शक्कल लढवून वाहतूक पोलिसांचे अधिकार थेट नागरिकांना दिले. पीटीपी अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगून, त्याद्वारे बेशिस्त वाहन चालकांच्या तक्रारी नोंदवण्याची सुविधा उपलब्ध केली. सर्वाधिक बेशिस्तांचे फोटो अपलोड करणार्‍यांवर बक्षिसांची खैरात केली. जे काम वाहतूक विभागाचे आहे, त्याच कामाला नागरिकांचा आधार घेण्यात आला. थेट ५० हजारांपासून ते ५ हजारांपर्यंत बक्षिसाची रक्कम जाहीर केली. अवघ्या एका महिन्यांत तब्बल ९३ हजार १९० नागरिकांनी पीटीपी अ‍ॅपचार वापर केला.

पुण्यात अशी झाली दंडवसुली

नागरिकांनी शहरातील विविध भागातील तब्बल १ लाख ८१ हजार ५५५ तक्रारी पीटीपी अ‍ॅपद्वारे नोंदविल्या. त्यानंतर वाहतूक विभागाने तक्रारीची पडताळणी करून १ लाख ३२ हजार ४८५ जणांना ऑनलाईनरित्या चलन पाठवून दंड ठोठावला. मात्र, ज्या नागरिकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता, त्यांना सर्वात आधी आपल्या वाहनावरील ऑनलाईन दंड वाहतूक विभागाकडे जमा करण्याची मेख प्रशासनाने मारली होती. तरच तुम्ही स्पर्धेत सहभागी होउन बक्षिस जिंकू शकता, असे जाहीर केले. त्यामुळे संंबंधित नागरिकांकडून तब्बल ३ कोटी ८४ लाख रूपये वाहतूक विभागाने जमा करून घेतले. कोणाची कटकट नाही, वादविवाद नाही, कसलाही त्रास नाही, पण दंडवसुली जोमात करीत पोलिसांनी पुणेकरांची फिरकीच घेतली आहे.

वाहतूक व्यवस्थापनासाठी ट्राफिक्युर सॉफ्टवेअर

वाहतूक व्यवस्थापन प्रभावी करण्यासाठी पुणे पोलिसांनी गुगलची मदत घेतली असून, ट्राफिक्युर सॉफ्टवेअर विकसित केले आहे. यामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांवर वारंवार होणार्‍या वाहतूककोंडीची प्रत्यक्षात वेळ माहिती होणार आहे. त्यामुळे घटनास्थळी वाहतूक अमलदार पोहचून कोंडी सोडवणार आहे. तब्बल ५५० पेक्षा जास्त रस्त्यांवर सॉफ्टवेअरद्वारे वाहतूकीचे निरीक्षण केले जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर पुण्यात जानेवारी ते फेबु्रवारीदरम्यान ४५ दिवस निरीक्षण केले असता, वाहतूकीचा प्रतितास वेग २६ किलोमीटर ८०० मीटर असल्याची नोंद केली आहे.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top
×