Breking News
दुचाकी वाहन चोरी करणारा चोरटा अटकेत – ४ गुन्हे उघडकीसआरोपींविरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी सखोत तपास-पोलीस अधीक्षकमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सारथीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळामहाराष्ट्राच्या १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने संरक्षण उत्पादनाचा मोलाचा वाटामहाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय – विशेष लेख साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या थेटकर्ज योजनेची लाभार्थी निवड १ जुलै रोजीकेंद्रीय सहकार मंत्रालयाच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रात २९ जून ते ६ जुलै २०२६ दरम्यान ‘सहकार सप्ताह’चे आयोजनटीमवर्क, अहोरात्र मेहनतीने १६ दिवसांत चार्जशीट-पोलीस अधीक्षकपुण्यात सॉफ्टवेअर कंपनीला २ कोटींचा चुनाकल्याणीनगरमध्ये दुकानातून रोकड चोरीला

दरोड्याच्या तयारीतील सराईत टोळीला अटक

गुंड सुरज ठोंबरे टोळीतील सराईत अटकेत, पिस्तूल जप्त

वारजे भागात कारवाई

marathinews24.com

पुणे – दरोड्याच्या तयारीत असलेल्या सराईत टोळीला वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून कोयता, तलवार, तसेच मिरची पूड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रतीक संजय हंकारे (वय १९), सूरज राणा गिरी (वय २३, रा. वडगाव शेरी), संस्कार युवराज एडके (वय १९), विशाल उत्तम वावळकर (वय २३), ऋत्विक राजू जंगम (वय १९, तिघे रा. वारजे माळवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलीस कर्मचारी निखिल तांगडे यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यातील रास्ता पेठेत भरदिवसा घरफोडी – सविस्तर बातमी 

लूटमार, दागिने हिसकाविणे अशा प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांना गस्त घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वारजे भागातील श्री छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलावाजवळ चोरट्यांची टोळी दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून हंकारे, गिरी, एडके, वावळकर, जंगम यांना पकडले. त्यांच्याकडून कोयता, तलवार, मिरची पूड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी सराइत असून, त्यांच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×