एमईए इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो २०२६ चे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून कौतुक

एमईए इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो २०२६ चे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून कौतुक

‘एमईए इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो २०२६’ ला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन आयोजकांचे केले कौतुक

marathinews24.com

पुणे – मराठा आंत्रप्रेन्युअर्स असोसिएशन (एमईए) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘एमईए इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो २०२६’ ला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले.

पुणे शहर भाजपा व्यापारी आघाडी अध्यक्षपदी महेश गुप्ता यांची नियुक्ती – सविस्तर बातमी 

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लघु, मध्यम तसेच नवउद्योजकांना जागतिक स्तरावर व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. रिअल इस्टेट, मॅन्युफॅक्चरिंग, आयटी, एफएमसीजी, ॲग्रो-टेक, लाइफस्टाईल, शिक्षण, हॉस्पिटॅलिटी आणि सेवा क्षेत्रातील ५०० हून अधिक उद्योजकांनी या एक्स्पोमध्ये सहभाग नोंदविला आहे.

यावेळी मंत्री पाटील म्हणाले की, मराठी उद्योजकतेला चालना देत महाराष्ट्रातील उद्योगशक्तीला सातासमुद्रापार नेण्याचा हा उपक्रम स्तुत्य आहे. मराठा तरुणांना उद्योजक बनविण्यासाठी २०१४ पासून सातत्याने करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना आता मूर्त स्वरूप येत असल्याचे पाहून आनंद होत आहे. उद्योग क्षेत्रात नव्या संधी निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असून शासन उद्योजकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असेही त्यांनी सांगितले.

एक्स्पोच्या माध्यमातून उद्योग-जाळे (नेटवर्किंग), गुंतवणूक संधी, तंत्रज्ञान आदानप्रदान आणि बाजारपेठ विस्तारासाठी भक्कम व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचे आयोजकांनी यावेळी नमूद केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×