Breking News
Pune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादBangkok to Pune Drug Smuggling : सुकामेवा, नुडल्‍सच्‍या पॅकेटमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्‍करीSafai Karmachari Issues Pune : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – भगवत प्रसाद मकवानाBaramati Youth Festival 2026 : बारामती येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्नPune Cyber Crime : एसआयआरचा फॉर्म भरण्याची बतावणीने गंडाPune Crime News : येरवड्यात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज चोरीलाPune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्तPune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्णDeveloped Maharashtra 2030 : लोकाभिमुख प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींवर भर द्यावा – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

श्री शिवजयंती निमित्त प्रमुख रस्त्यावर वाहतूक बदल

Pune Traffic News

मध्य भागातील मिरवणूक मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने

marathinews24.com

पुणे – श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीप्रमाणे साजऱ्या होणाऱ्या जयंतीनिमित्त शुक्रवारी (६ मार्च) मध्य भागातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, लक्ष्मी रस्ता, पं. जवाहरलाल नेहरु रस्ता, बाजीराव रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. ‘श्री शिव जयंती निमित्त मध्य भागासह शहराच्या वेगवेेगळ्या भागातून मिरवणुका काढण्यात येतात. या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत.

शिष्यवृत्ती परीक्षेकरिता नोंदणी आणि आवेदनपत्र भरण्यासाठी ६ मार्चपर्यंत मुदतवाढ – सविस्तर बातमी

मिरवणूक मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. मिरवणूक मार्गस्थ झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यत येईल. मध्य भागातील लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, नेहरू रस्ता, बाजीराव रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत सकाळी सात वाजल्यापासून बदल करण्यात येणार आहेत’, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.

मध्य भागातील काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांमुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याने स्वारगेटकडे जाणऱ्या वाहन चालकांनी जंगली महाराज रस्त्यावरील स. गो. बर्वे चौक (माॅडर्न कॅफे), झाशीची राणी चौकमार्गे, डेक्कन जिमखाना, टिळक रस्त्याने इच्छितस्थळी जावे. कसबा पेठेतील गणेश रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक दारूवाला पूल चौकातून वळविण्यात येणार आहे.

आवश्यकतेनुसार नारायण पेठेतील केळकर रस्त्याने अप्पा बळवंत चौक, हुतात्मा चौकाकडे (बुधवार चौक) जाणारी वाहतूक वळविण्यात येणार आहे. प्रथेप्रमाणे भवानी पेठेतील श्री भवानी माता मंदिर येथून सायंकाळी मिरवणुकीचा प्रारंभ होईल, मिरवणूक लक्ष्मी रस्त्यावर आल्यानंतर वाहतूक संत कबीर चौकातून नेहरू रस्त्याने वळविण्यात येणार आहे. टिळक रस्त्यावरील पूरम चौकातून बाजीरावर रस्त्याकडे जाणारी वाहतूक गरज भासल्यास पूरम चौकातून टिळक रस्तामार्गे वळविण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

लष्कर भागात वाहतूक बदल

लष्कर भागातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. गोळीबार मैदान चौकातून महात्मा गांधी रस्त्याकडे जाणारी वाहतूक वाय जंक्शने येथून वळविण्यात येणार आहे. मुफ्ती फौज चौकातून कुरेशी मशिदमार्गे जाणारी वाहतूक वळविण्यात येणार आहे. व्होल्गा चौकातून महंमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक गरज भासल्यास वळविण्यात येणार आहे. महावीर चौकातून सरबतवाला चौकाकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्यात येणार आहे. बाबाजान चौकातून भोपळे चौकाकडे जाणारी वाहतूक गरज भासल्यास वळविण्यात येणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×