Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

अनैतिक संबंधाला विरोध केल्याने मनोरूग्ण महिलेचा खून

पुण्यातील वडकी गावातील घटना; आरोपीला अटक

marathinews24.com

पुणे – अनैतिक संबंधाला विरोध करणार्‍या मनोरूग्ण महिलेच्या डोक्यात मारून तिचा खून केल्याची घटना २८ फेबु्रवारी ते ३ मार्च कालावधीत हडपसर सासवड रस्त्यावर वडकी गावात घडली आहे. याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. प्रकाश बिभीषण माने (वय २९, रा. वडकीनाला, हवेली ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार अमोल मोरे (वय ४३) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान, महिलेची ओळख पटलेली नाही.

वाहनाच्या धडकेत तरूण ठार, खराडीतील घटना – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर-सासवड रस्त्यावरील वडकी गावातील काची कंपनीच्या गोदामाजवळ असलेल्या मोकळ्या जागेत एक महिला मृतावस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर फुरसुंगी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. महिलेच्या डोक्यात कठीण वस्तुने प्रहार केल्याचे घडकीस आले. उपचारांपूर्वीच महिलेचा मृत्यू झाला होता. खून झालेल्या महिलेचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्ष आहे. तिची ओळख पटलेली नाही. पोलिसांकडून महिलेची ओळख पटलेली नाही. हडपसर, सासवड, फुरसुंगी परिसरातून बेपत्ता झालेल्या महिलांची पोलिसांकडून माहिती घेण्यात येत आहे.

कोट- आरोपी प्रकाश माने याने तिचा खून केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने त्याला ताब्यात घेत अटक केली आहे. याप्रकरणी महिलेचे ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख यांनी दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×