Breking News
जिल्हा परिषद सदस्याची विकासात्मक दृष्टी ठरेल ग्रामविकासाला नवी चालना देणारी सुदृढ स्नायू, सुडौल शरीरासाठी ‘वंडर एक्सॉन’ तंत्रज्ञान प्रभावीपुण्यात सराईत गुंडाचा मित्रांकडून खूनपुणे पोलीस नियंत्रण कक्षातील गैरहजरी भोवलीतब्बल ६० लाखांचा गुटखा जप्तउष्णतेच्या लाटेपासून पशुधनाचा बचाव करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबिनव्याजी कर्जाचे आमिष दाखवून ग्राहकांची फसवणूकग्राहकांच्या तक्रारीची गांर्भीयाने दखल घेत प्राधान्याने सोडावाव्यातविवाहितेला प्रेमात फसवले, अपमानित झाल्याने महिलेने केली आत्महत्यापॉर्न व्हिडिओ का पाठवले, पुण्यात बतावणीने जेष्ठाला ३५ लाखांना गंडा

पुण्यात तरुणीचा विनयभंग करणारा ‘डिलिव्हरी बाॅय’ गजाआड

खुनासाठी पिस्तुल बाळगणाऱ्या सराईताला अटक

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – ऑनलाइन वस्तू घरपोच देणाऱ्या डिलिव्हरी बाॅयने एका तरुणीचा विनयभंग केल्याची घटना शिवाजीनगर गावठाण भागात घडली. पाणी मागण्याचा बहाणा करुन त्याने तरुणीचा विनयभंग केला. पसार झालेल्या डिलिव्हरी बाॅयला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. श्रीधर हरीभाऊ कांबळे (वय २७, सध्या रा. शुक्रवार पेठ, मूळ रा. कराड, जि. सातारा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वैमनस्यातून मार्केटयार्ड परिसरात एकावर पिस्तुलातून गोळीबार – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर गावठाण परिसरात ६ मार्चला सायंकाळी पाचच्या सुमारास कांबळे हा तरुणीच्या घरी गेला. तरुणीने ऑनलाइन खरेदी केली होती. वस्तू देत असताना त्याने तरुणीकडे पाणी मागितले. तरुणीने त्याला पाणी दिले. तेव्हा ‘तुम्ही खूप सुंदर दिसता’, असे कांबळे म्हणाला. कांबळेच्या वर्तनामुळे तरुणी घाबरली. तिने आरडा ओरडा केला. कांबळे तेथून पसार झाला.

तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी तांत्रिक तपास करुन कांबळेचा मोबाइल क्रमांक मिळवला, तसेच परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले. कांबळेला पोलिसांनी अटक केली असून, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×