Breking News
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली नसरापूर घटनेतील पीडित कुटुंबीयांची भेटनसरापुरात आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी – डॉ. नीलम गोऱ्हेपुण्यात तब्बल २८ लाखांची लाच घेताना सहायक पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यातसत्ताधाऱ्यांविरोधात एकजुटीने व सातत्यपूर्ण संघर्ष करण्याची गरज‘जनगणना २०२७’ कल्याणकारी योजनांची सुनिश्चिती- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारबुद्ध पौर्णिमेनिमित्त ‘धम्म पहाट’ला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसादभोर तालुक्यात बालिकेवर अत्याचार करून खूनलाच मागितल्यापकरणी पोलीस उपनिरीक्षकाला अटकदारू पिण्याच्या वादातून मजुराच्या डोक्यात दगड घालून खून“संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा गौरव: संघर्षाने उभारलेला हे राज्य, आजची वास्तविकता!” – विशेष लेख

पुण्यात सायबर चोरट्यांकडून तिघांची फसवणूक

ज्येष्ठ नागरिकाची १ कोटी १७ लाखांची फसवणूक

३८ लाखांचा गंडा

marathinews24.com

पुणे – सायबर चोरट्यांकडून वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरत तिघांची तब्बल ३८ लाखांची फसवणूक केली आहे. दोघांना शेअर मार्केट तर दुसऱ्याला बिटकॉईनच्या गुंतवणूकीवर जादा परतावा देण्याच्या आमिषाने फसवणूक केली आहे. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद केले आहे. पहिल्या घटनेत ३६ वर्षीय व्यक्तीची १० लाख ८६ हजारांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांत आयटी ऍक्ट तसेच कलमांनुसार गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार कात्रज भागात राहण्यास आहेत. त्यांना चोरट्यांनी फोनद्वारे संपर्क साधत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणावर नफा कमावून देण्याचे आमिष दाखविले. त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर महिलेने गुंतवणूकीच्या नावावर सांगितल्याप्रमाणे १० लाख ८६ हजार रूपये ऑनलाईनरित्या वर्ग केले. मात्र, त्यांना परतावा मिळाला नाही. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक राहूल खिलारे करीत आहेत.

वाहतूक पोलिसांच्या चलनामुळे मोबाईल हिसकावणारी टोळी जेरबंद – सविस्तर बातमी 

हडपसरमधील एकाची बिटकॉईनच्या नावाने १२ लाख ११ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी ५४ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. तक्रारदारांना मोबाईल धारकांनी बिटकॉईनमध्ये गुंतवणूकीसाठी एक लिंक पाठवली. या लिंकवर रजिस्ट्रेशन करण्यास सांगितले. त्यांनी रजिस्ट्रेशन केल्यानंतर बाय-बाय करण्यास सांगत १२ लाख ११ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. तिसऱ्या घटनेत वारजेतील ५० वर्षीय व्यक्तीची शेअर मार्केटच्या गुंतवणूकीवर खूप मोठा फायदा होईल असे सांगत १५ लाख ७८ हजार रुपयांचा ऐवज चोरला आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×