Breking News
जनगणना २०२७ प्रक्रियेला आजपासून प्रारंभ; विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केली स्व-गणना‘दगडूशेठ’ गणपतीला ५ हजार शहाळ्यांचा महानैवेद्यपुण्यात ६७ वा महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्नपुण्यात भरधाव कारची दोन विद्यार्थिनी धडकगोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमी

सीआयडीकडून व्हीएसआर कंपनीच्या मालकाची दोन दिवस चौकशी

सीआयडीकडून व्हीएसआर विमान कंपनीच्या मालकाची चौकशी

व्ही. के. सिंग यांच्या मुलाचीही होणार चौकशी

marathinews24.com

पुणे – राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकस्मात मृत्यू प्रकरणात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांची सोमवारी (दि.९) पुन्हा चौकशी केली. चौकशीतील तपशील समजू शकला नाही. मात्र, चौकशी दोन दिवस झाली असून, यानंतर व्ही. के. सिंग यांच्या मुलाकडेही पुढील काळात चौकशी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

देशातील वाढत्या रस्ते अपघातांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे – सविस्तर बातमी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. याप्रकरणी बारमती ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यानंतर शासनाने राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे तपास दिला. त्यानूसार सीआयडी याप्रकरणाचा तपास करत आहेत.

सीआयडी अधिकाऱ्यांनी नुकतीच स्वत:हून पत्रकार परिषद घेत तपासाबाबतची माहिती माध्यमांना दिली होती. दरम्यान, अपघाती मृत्यू, हलगर्जीपणा की घातपात असा संशय व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदा घेऊन काही गंभीर आरोप केले होते. सीआयडीने डीजीसीए (डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन) आणि त्‍याबरोबर एएआयबी (एअरक्राफ्ट ॲक्‍सीडन्ट इन्व्‍हीस्‍टीगेशन ब्युरो) यांच्‍या तपासाच्‍या पार्श्वभूमीवर प्रथमच याप्रकरणात चौकशी गुरुवारी व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांना चौकशीसाठी बोलावले होते. सोमवारीही त्यांची चौकशी करण्यात आली आहे. दिवस चौकशीचा तपशील मात्र समजू शकला नाही. नेमकी चौकशी कोणत्या मुद्यावर झाली. तसेच, यासंदंर्भात त्यांनी जबाब काय दिला हे प्रश्न अन्नुतरीत आहेत. दरम्यान, व्ही. के. सिंग यांच्या मुलाकडे देखील पुढील काळात चौकशी होणार आहे.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top
×