पुण्यात लाच मागणारा पोलीस उपनिरीक्षक जाळ्यात

पुण्यात लाच मागणारा पोलीस उपनिरीक्षक जाळ्यात

१ लाखांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – तक्रार अर्जावरून फसवणूकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी १ लाखांची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकावर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक संदीप खेडकर यांच्याविरूद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७, ७अ नुसार गुन्हा नोंद केला आहे. याबाबत ४० वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे.

सीआयडीकडून व्हीएसआर कंपनीच्या मालकाची दोन दिवस चौकशी – सविस्तर बातमी 

उपनिरीक्षक संदीप खेडकर हे बंडगार्डन ठाण्यात नेमणूकीस आहेत. तक्रारदारविरूद्ध फसवणूकीबाबत एक तक्रार अर्ज दाखल झाला आहे. अर्जाची चौकशी उपनिरीक्षक संदीप यांच्याकडे होती. तेव्हा या अर्जावरून तक्रारदार यांच्याविरूद्ध फसवणूकीचा गुन्हा नोंद न करण्यासाठी २ लाखांची लाच मागितली. लाच मागणी झाल्यानंतर तक्रारदारांनी एसीबीकडे तक्रार केली होती. तडजोडीअंती स्वत:साठी व वरिष्ठांसाठी १ लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एसीबीने त्यांच्याविरूद्ध गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×