तरूणाला १६ लाख ७० हजारांचा गंडा
marathinews24.com
पुणे – शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देण्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी तरूणाला तब्बल १६ लाख ७० हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना २१ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर २०२५ कालावधीत वडगावमध्ये घडली आहे. याप्रकरणी ३८ वर्षीय तरूणाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, लिंकधारकाविरूद्ध गुन्हा दाखल कण्यात आला आहे.
लोहगावमध्ये घरफोडी, ७ लाखांचे दागिने चोरीला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे वडगावमध्ये राहायला असून, २१ नोव्हेंबरला सायबर चोरट्यांनी त्यांच्याशी संपर्क केला. त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देण्याची बतावणी केली. सायबर चोरट्यांनी तक्रारदाराचा विश्वास संपादित केल्यानंतर त्यांना गुंतवणूकीला भाग पाडले. अवघ्या एक महिन्यात तब्बल १६ लाख ७० हजारांची गुंतवणूक केल्यानंतरही तक्रारदाराला परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधिताने सिंहगड पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक समीर गायकवाड तपास करीत आहेत.






















