पिस्तुल बाळगणार्‍या तिघांवर गुन्हा दाखल

गाडी चालकावरून झाला वाद; डोक्यात घातला दगड

पिस्तूल, काडतुस, गाडी जप्त

marathinews24.com

पुणे – बेकायदेशिररित्या पिस्तुल बाळगणार्‍या तिघांवर फुरसुंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तुल, जिवंत काडतुस, मोटार जप्त करण्यात आली आहे. शुभम चिमा गायकवाड (वय २५), गौरव हनुमंत भाडळे (वय २४) आणि नागेश गोपाल निलेवाड (वय २३, सर्व रा. उरूळी देवाची, पुणे) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. पोलिस हवालदार नितीन माणिक गायकवाड यांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

चांदीची नाणी पाठवण्यास भाग पाडून ७ कोटींची फसवणूक – सविस्तर बातमी

फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उपनिरीक्षक विनोद पवार, बापुसाहेब खंदारे, सहायक पोलिस उपनिरीक्षक कदम, अमंलदार सागर वणवे, टिळेकर, कामथे हे पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी ७ मार्चला रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास उरूळी देवाची परिसरातील कोंडे वस्तीवर काहीजण संशयीतरित्या थांबल्याची माहिती मिळाली. त्यांच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने त्यांना झांबरे गोठ्या जवळून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पिस्तूल जप्त केले असून, त्यांनी हे पिस्तूल कोठून आणले, तसेच ते कशासाठी आणले गेले यादृष्टीने पोलिस तपास करत आहेत.

बेकायदेशिर पोस्टर लावल्याप्रकरणी गुन्हा

परवानगी न घेता कलेक्टर कचेरी परिसरात बोर्ड, बॅनर, भिंती पत्रके बसस्टॉपवर चिकटवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. चार मोबाईल क्रमांकधारक व्यक्तींवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दिलीप किसन कुलाळ (वय ४९, रा. मु. पो. उरूळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १३ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान घडला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×