Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

चांदीची नाणी पाठवण्यास भाग पाडून ७ कोटींची फसवणूक

जमीन खरेदीत गुंतवणुकीच्या आमिषाने अडीच कोेटींची फसवणूक

लष्कर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – गिफ्ट वस्तू पुरवठ्याच्या व्यवसायातून चांदीची नाणी पुरवूनही त्याचे पैसे न दिल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध लष्कर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यात तब्बल ७ कोटी १३ लाख ६२ हजार २७६ रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी बावधन येथील ड्रीम रिदम सोसायटीत राहणाऱ्या ३९ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानुसार राहुल दर्शन जगताप, एंजल राहुल जगताप, सुशीला दर्शन जगताप (सर्व रा. सानपाडा, नवी मुंबई) तसेच गणेश चेट्टीयार (रा. एनआयबीएम रोड, कोंढवा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १३ डिसेंबर २०२३ ते २४ जानेवारी २०२४ या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.

नोकरीच्या आमिषाने तरुणांची फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेचा गिफ्ट वस्तू पुरवठ्याचा व्यवसाय आहे. आरोपींनी रिजॉइस इव्हेंट मॅनेजमेंट ऑर्गनायझर कंपनीमार्फत त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात चांदीची नाणी मागवली होती. त्यानुसार तक्रारदारांनी त्यांना सुमारे ७ कोटी ४९ लाख २४ हजार ८३० रुपयांची चांदीची नाणी पुरवली. मात्र, या व्यवहारातील ४ कोटी २५ लाख ५७ हजार ३७३ रुपये तक्रारदारांना देण्यात आले नाहीत. जीएसटीसह थकीत रक्कम, मोबदला आणि दंडाची रक्कम मिळून एकूण ७ कोटी १३ लाख ६२ हजार २७६ रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक पी. बी. कणसे करत आहेत

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×