Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

नोकरीच्या आमिषाने तरुणांची फसवणूक, टोळीला अटक

 ऑनलाइन टास्कच्या आमिषाने ३३ लाखांची फसवणूक

नोकरी लावण्याचे आमिष दाखवून उकळत होता पैसे

marathinews24.com

पुणे – वेगवेगळ्या कन्सलटंन्सीमार्फत तरुणांना नामांकित कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळत तब्बल १ कोटी ५१ लाख ८७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींनी अटक केली आहे.

वडगाव पुलावर वाहनाच्या धडकेत एकजण ठार – सविस्तर बातमी

‘कॉन्टम सॉफ्ट टेक्नॉलॉजी प्रा. लि’च्या सीईओ निखिलेश्वर अशोक क्षीरसागर (मूळ रा. अमरावती), अमोल रघुनाथराव शेवणे, डॉ. केतन शेवटकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सीईओसह इतरांना अटक केली आहे. विश्वास ज्ञानेश्वर पाटील (वय ३३, रा. विशालनगर, न्यू डीपी रोड, पिंपळे निलख) विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, कॉन्टम सॉफ्ट टेक्नॉलॉजी प्रा. लि. ही कंपनी आहे. त्याचे ऑफिस विमाननगर येथे निको गार्डन समोरील सॉलिटर बिझनेस हब येथे आहे. आरोपींनी विविध कन्सल्टन्सीमार्फत तक्रारदार आणि इतर तरुणांना कंपनीत नोकरी देण्याचे आमिष दाखवले. त्यांच्याकडून काम करून घेत असतानाही पगार देण्यात आला नाही. तसेच कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी (पीएफ) खाते उघडून त्यामध्ये कोणतीही रक्कम जमा न करता त्या पैशांचा अपहार केल्याचा आरोप आहे. तक्रारदार विश्वास पाटील यांच्याकडून २ लाख पाच हजार रुपये घेतले आहे. तर, इतर अनेक तरुणांकडूनही पैसे उकळण्यात आले. अशा प्रकारे १ कोटी ५१ लाख ८७ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×