Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पुण्यात दहावीची गणिताची प्रश्नपत्रिका फुटली ?

पुण्यात दहावीची गणिताची प्रश्नपत्रिका फुटली ?

पेपर सोशल प्रसारित; शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – दहावीची गणित भाग एक आणि दोन या विषयांची प्रश्नपत्रिका फुटल्याचे उघडकीस आले आहे. समाज माध्यमात या दोन विषयांची प्रश्नपत्रिका अज्ञाताने प्रसारित केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागीय कार्यालयाने पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागीय कार्यालयातील अधीक्षक चंद्रकांत वैजनाथ जेवळीकर (वय ५३) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, समाज माध्यमातील एका समुहावर दहावीतील गणित भाग – १ आणि गणित भाग – २ या दोन विषयांची प्रश्नपत्रिका प्रसारित केल्याप्रकरणी संबंधित समुहाचा चालक (ॲडमिन), समुहातील सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यात लष्कर भागात इमारतीत आग – सविस्तर बातमी 

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डाॅ. दीपक माळी यांनी मंडळाचे सचिव डाॅ. मीनाक्षी राऊत यांना याबाबतची ९ मार्च रोजी दहावीच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिका समाज माध्यमातील एका समुहात प्रसारित झाल्याबाबतची माहिती दिली. समाज माध्यमातील संबंधित लिंकची तपासणी करण्यात आली. तेव्हा ५ मार्च रोजी समाज माध्यमातील संबंधित लिंकवर गणित भाग – १ ची प्रश्नपत्रिका प्रसारित करण्यात आली होती, तसेच गणित भाग – २ ची प्रश्नपत्रिका ६ मार्च रोजी प्रसारित करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाा, असे जेवळीकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेचे कलम २२३, ३ (५) सह महाराष्ट्र विद्यापीठाच्या, मंडळाच्या, इतर परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९८२ चे कलम ६, ७ , तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×