Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

बारामती पोटनिवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

एकूण मतदार ३ लाख ८३ हजार ७६७

marathinews24.com

पुणे – बारामती (२०१) विधानसभा मतदारसंघाच्या आगामी पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने १ जानेवारी २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण करून अंतिम मतदार यादी आज १० मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पुण्यात दहावीची गणिताची प्रश्नपत्रिका फुटली? – सविस्तर बातमी

या अंतिम यादीनुसार मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या ३ लाख ८३ हजार ७६७ इतकी झाली आहे.
भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्या दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या पत्रानुसार बारामती विधानसभा मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार ९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर ९ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात आल्या. प्राप्त अर्जांची छाननी करून आवश्यक ती दुरुस्ती केल्यानंतर अंतिम मतदार यादी १० मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अंतिम मतदार यादीत पुरुष मतदारांची संख्या १ लाख ९३ हजार ४९६, महिला मतदारांची संख्या १ लाख ९० हजार २७१, तर इतर मतदारांची संख्या २४ असून एकूण मतदारसंख्या ३ लाख ८३ हजार ७६७ इतकी आहे.
यापूर्वी २० ऑक्टोबर २०२४ रोजी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीत एकूण मतदारसंख्या ३ लाख ६० हजार ६०८ इतकी होती. त्यानंतर ९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत एकूण मतदारसंख्या ३ लाख ८८ हजार ३७१ इतकी नोंदविण्यात आली होती.

सदर अंतिम मतदार यादी सर्व नागरिक व राजकीय पक्षांसाठी पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आली असून यासंदर्भात लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० मधील तरतुदीनुसार अपील करण्याची तरतूद आहे. संबंधित अपील जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे यांच्याकडे १५ दिवसांच्या आत दाखल करता येईल, अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×