Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

लष्करी अधिकाऱ्याच्या घरातून मद्याच्या बाटल्या चोरी

कोथरुड आणि कोंढवा परिसरात घरफोडी

चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – लष्करी अधिकाऱ्याच्या बंगल्यातून मद्याच्या बाटल्या चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना एम्प्रेस गार्डन परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत लष्करातील जवान विक्रम दिलीप शिरगिरे (वय ३४, रा. फॅमिली क्वार्टर कॅम्प, घोरपडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात लष्करी भागात इमारतीला आग – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोरपडीतील एम्प्रेस गार्डन परिसरात छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर मेजर हिमांशू यांचा बंगला आहे. ९ मार्च रोजी मध्यरात्री चोरटे बंगल्याच्या आवारात शिरले. चोरट्यांनी बंद बंगल्याच्या दरवाज्याचे कुलूप तोडले. चोरट्यांनी मेजर हिमांशू यांच्या बंगल्यातून विविध प्रकारच्या मद्याच्या बाटल्या चोरून नेल्या. चोरलेल्या मद्याच्या बाटल्यांची किंमत ५२ हजार २५० रुपये आहे. पोलीस उपनिरीक्षक औचरे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×