Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पुण्यात फॉरचुनर गाडीतून गांजाची तस्करी; आरोपीला अटक

१० लाख ६० हजारांचा गांजा, अलिशान गाडी जप्त

marathinews24.com

पुणे – फॉरचुनर गाडीतून गांजाची तस्करी करणाऱ्याला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक एकने बेड्या ठोकल्या आहेत. कारवाईत १० लाख ७० हजारांचा ५३ किलो १४ ग्रॅम गांजा आणि गाडी असा ४० लाख ७० हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. प्रितम रविंद्र कुंजीर (वय ३२, रा. मुळा-भुमा मळा, म्हसोबा मंदिराजवळ, थेरगाव,पुणे) याला ताब्यात घेण्यात आले.

चेष्टा मस्करीतून वास्तूविशारद तरुणाचा भोसकून खून – सविस्तर बातमी 

अमली पदार्थ विरोधात सुरू असलेल्या कारवाईदरम्यान गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत गांजा विक्रीसाठी आणणाऱ्याला अटक केली आहे. दि. ११ मार्चला अमली पदार्थ विरोधी पथक एक हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी पथकाला माहिती मिळाली की, पांढऱ्या रंगाच्या फॉर्च्युनर गाडीतून गांजाचा मोठा साठा विक्रीसाठी थेऊर परिसरात येणार आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून थेऊर मुळा-भुमा मळा परिसरात कारवाई केली. आरोपीला ताब्यात घेत त्याच्याकडून ५३ किलो गांजा, गाडी, मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजन शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, एपीआय अनिल सुरवसे, उपनिरीक्षक विजय पैठणे, विदुल साळुंखे, संजय राजे, रिहान पठाण, अमोल सरडे, आण्णा माने, निलेश जाधव, विजय कांबळे, मंगेश गुंड, विशाल भिलारे, राहुल शिंदे, अक्षय शिर्के, आशा भिंगारे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×