Breking News
जिल्हा परिषद सदस्याची विकासात्मक दृष्टी ठरेल ग्रामविकासाला नवी चालना देणारी सुदृढ स्नायू, सुडौल शरीरासाठी ‘वंडर एक्सॉन’ तंत्रज्ञान प्रभावीपुण्यात सराईत गुंडाचा मित्रांकडून खूनपुणे पोलीस नियंत्रण कक्षातील गैरहजरी भोवलीतब्बल ६० लाखांचा गुटखा जप्तउष्णतेच्या लाटेपासून पशुधनाचा बचाव करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबिनव्याजी कर्जाचे आमिष दाखवून ग्राहकांची फसवणूकग्राहकांच्या तक्रारीची गांर्भीयाने दखल घेत प्राधान्याने सोडावाव्यातविवाहितेला प्रेमात फसवले, अपमानित झाल्याने महिलेने केली आत्महत्यापॉर्न व्हिडिओ का पाठवले, पुण्यात बतावणीने जेष्ठाला ३५ लाखांना गंडा

‘डिजिटल अरेस्टच्या बतावणीने जेष्ठाची १० कोटी ७४ लाखांची फसवणूक

आणखी एकाला सोलापुरातून बेड्या

marathinews24.com

पुणे – ‘सीबीआय अधिकारी’ असल्याची बतावणी करून ‘डिजिटल अरेस्टच्या बतावणीने पुण्यातील ज्येष्ठ नागरिकाला धमकावून तब्बल १० कोटी ७४ लाख ६५ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीतील आणखी एकाला पुणे सायबर पोलिसांनी सोलापूरमधून बेड्या ठोकल्‍या. अमर शिवाजी अत्तरगी (रा. मोदीखाना, सोलापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. यापूर्वी हर्षद सुभाष धनतोले (रा. कर्वेनगर) आणि समर्थ सुरेश देशमुख (वय २४, रा. कर्वेनगर) यांना २२ फेब्रुवारीला अटक झाली होती.

पुण्यात फॉरचुनर गाडीतून गांजाची तस्करी; आरोपीला अटक – सविस्तर बातमी

तपासात आरोपी धनतोलेने एटीएममधून काढलेली रक्कम रोहन जाधव (रा. सांगवी) याच्याकडे दिल्याची माहिती समोर आली होती. सायबर पोलीस स्टेशन, आर्थिक व सायबर गुन्हे शाखेत या प्रकरणी गुन्हा दाखल असून आरोपींनी सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करत फिर्यादी ज्येष्ठ नागरिकाला ‘डिजिटल अरेस्ट’ असल्याची भीती दाखवली. तुमच्या आधार कार्डचा गैरवापर होऊन बँक खात्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे सांगत त्यांना अटक होऊ शकते, अशी धमकी देण्यात आली. या प्रकरणातून सुटका करून देण्याचे आमिष दाखवत आरोपींनी फिर्यादीला विविध बँक खात्यांमध्ये रक्कम ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. या प्रकारात फिर्यादीकडून वेगवेगळ्या खात्यांवर १० कोटी ७४ लाख रुपयांहून अधिक रक्कम ट्रान्सफर करून घेण्यात आली.

तपासादरम्यान फिर्यादीने ३० जानेवारी २०२६ रोजी ७५ लाख रुपये येस बँकेच्या एका खात्यावर जमा केल्याचे समोर आले. त्या खात्यातून पुढे बँक ऑफ महाराष्ट्रच्या तीन खात्यांवर सुमारे ६ लाख ५० हजार रुपये वळविण्यात आले होते. तपासाची साखळी पुढे नेताना रोहन जाधव याचा शोध घेत असताना अमर अत्तरगी याचा या व्यवहाराशी संबंध असल्याचे उघड झाले. फिर्यादीकडून पाठवलेल्या रकमेपैकी काही रक्कम बँक ऑफ इंडियाच्या खात्यावर पाठवून ती चेकद्वारे काढण्यात आल्याचे निष्पन्न झाले. हे खाते अमर अत्तरगीच्या नावावर असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सायबर पोलिसांनी सोलापूरच्या मोदीखाना परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोलिस निरीक्षक संगिता देवकाते, उपनिरीक्षक अजित बडे, अमंलदार साळवे, भोसले, राठोड यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×