Breking News
जनगणना २०२७ प्रक्रियेला आजपासून प्रारंभ; विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केली स्व-गणना‘दगडूशेठ’ गणपतीला ५ हजार शहाळ्यांचा महानैवेद्यपुण्यात ६७ वा महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्नपुण्यात भरधाव कारची दोन विद्यार्थिनी धडकगोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमी

शेतकरी कल्याणाच्यादृष्टीने सामूहिक काम करुया-उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

शेतकरी कल्याणाच्यादृष्टीने सामूहिक काम करुया-उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते रयत भवन शेतकरी मॉलच्या इमारतीचा पायाभरणी

marathinews24.com

बारामती – बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती नेहमीच शेतकरी हित व कल्याणाचा विचार करुन काम करीत आलेली आहे; आगामी काळातही देशातील सर्वोत्तम कृषी उत्पन्न बाजार समिती बनविण्यासोबत शेतकऱ्यांच्या हितासाठी सामूहिक जबाबदारीने काम करुया, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले. तसेच नुतून रयत भवन शेतकरी मॉलमुळे बारामतीच्या विकासात नवे परिणाम, शेतकऱ्यांना विविध संधी मिळण्यास मदत होईल, अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुळा–मुठा नदीत कचरा टाकण्याविरोधात विद्यार्थ्यांचा पुन्हा एल्गार – सविस्तर बातमी 

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रयत भवन शेतकरी मॉलच्या पायाभरणी समारंभप्रसंगी त्या बोलत होते. यावेळी उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, पंचायत समितीचे सभापती किरण तावरे, नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सचिन सातव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक गावडे, उप सभापती अरुण सकट, संचालक मंडळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

पवार म्हणाल्या, बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीला सुमारे ९० वर्षाची परंपरा आहे. शेतकरी वर्गाला केंद्रबिंदू मानून पारदर्शक व्यवहार, शेतमालाचे अचूक वजन, त्वरित पट्टी देण्याची व्यवस्था, ई-नाम द्वारे ऑनलाईन लिलाव आणि संगणकीकृत व्यवहार अशापद्धतीने अतिशय उत्तम काम करीत आहे. राज्यातील ३०० हुन अधिक बाजार समित्यांमध्ये बारामती बाजार समितीने प्रथम मिळवून आदर्श बाजार समिती म्हणून ओळखली निर्माण केली आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. बारामती परिसरातील शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन नाविन्यपूर्ण प्रयोग शेतीमध्ये राबवितात.त्यामुळे या परिसराची ओळख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेली आहे.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जळोची कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शीतगृह, ग्रेडिंग, पॅकींग, निर्यात सुविधा केंद्र, रेशीम कोशाचे ई-नामद्वारे लिलाव सुविधामुळे शेतमालाला अधिकचा भाव मिळण्यास मदत होणार आहे. रेशीम कोशासाठी ई-नामद्वारे लिलाव सुरु करुन देशापुढे आदर्श निर्माण केला आहे.

नवीन रयत भवन शेतकरी मॉलमुळे शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांना एकाच ठिकाणी आधुनिक पद्धतीने सेवा मिळणार आहे. भाडे उत्पन्नापोटी मिळणाऱ्या दोन कोटी रुपयामुळे समितीची आर्थिक क्षमता बळकट होण्यास मदत होणार आहे. आगामी काळात या निधीचा उपयोग शेतकरी व बाजार घटकासाठी अधिक सुविधा निर्माण करण्यात येईल, संचालक मंडळाच्यावतीने करण्यात आलेल्या सूचनांवर सकारात्मक पद्धतीने विचार करण्यात येईल, असेही पवार म्हणाल्या.

तावरे म्हणाले, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आग्रही होते. त्यांच्या स्वप्नातील बारामती घडविण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करुया, असेही तावरे म्हणाले.

गावडे यांनी प्रास्तविकात नव्याने उभारण्यात येणाऱ्या शेतकरी मॉलमध्ये करण्यात येणाऱ्या सुविधांबाबत माहिती दिली. या शेतकरी मॉलला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव देण्याबाबत संचालक मंडळाच्यावतीने सूचना केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×