पुण्यात पोपट-मांजराचा वाद थेट ठाण्यात पोहचला

लव्हज बर्ड

दोन शेजाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी

marathinews24.com

पुणे – शहरात घडलेल्या एका वेगळ्याच प्रकाराने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. लव्हबर्ड (पोपट) आणि मांजर यांच्यातील ‘वाद’ दोन शेजाऱ्यांमधील हाणामारीपर्यंत पोहोचला. प्रकरण थेट पोलीस ठाण्यापर्यंत गेला आहे.ही घटना ताडीवाला रोड परिसरातील भारत मित्र मंडळासमोर 8 मार्चला घडली. याप्रकरणी मांजर पाळणारे शेजारी दिनेश रंगराव पोताबत्तोनी यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात बीएनएसचे कलम 118 (1) नुसार गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

सिग्नलवर वाहनांच्या काचेला ‘टक-टक’ करून चोरी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक सिंग हे कुटुंबासह ताडीवाला रोड परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांनी घरात लव्हबर्ड्स (छोटे पोपट) पाळले आहेत. त्यांचा पिंजरा घरासमोर ठेवलेला असतो. शेजारी राहणारे दिनेश पोताबत्तोनी यांनी मांजर पाळले आहे. संबंधित मांजर परिसरात मोकळेपणाने फिरत होते. ते वारंवार सिंग यांच्या घरासमोर येऊन लव्हबर्ड्सच्या पिंजऱ्याभोवती फिरत होते. काही वेळा मांजरीने पिंजरा ढकलल्याचाही प्रकार घडल्याने सिंग कुटुंबीय त्रस्त झाले होते. याबाबत त्यांनी पोताबत्तोनी यांना मांजरीवर लक्ष ठेवण्यास सांगितले. मात्र याच कारणावरून दोन्ही शेजाऱ्यांमध्ये वाद सुरू झाला. काही वेळातच दोन्ही कुटुंबीय रस्त्यावर आले.

एकमेकांना शिवीगाळ, धक्काबुक्की केली. वाद हाणामारीपर्यंत पोहोचला. या मारहाणीत अभिषेक सिंग यांना दुखापत झाली. दरम्यान, दिनेश पोताबत्तोनी यांच्या आईने “आमची मांजर त्यांच्या पोपटांकडे गेली का हे आम्हाला माहिती नाही. त्यांच्या घरीही मांजर आहेत. मुक्या प्राण्यांचा वाद माणसांमध्ये वाढला,” असे सांगितले. घटनेनंतर अभिषेक सिंग यांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार मांजरीच्या मालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×