Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पुणे स्टेशन परिसरात तरुणाला धमकावून लुटले

लक्ष्मी रस्त्यावर महिलेच्या पिशवीतून दागिने चोरीला

मोटारीतून आलेल्या आरोपींविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – स्टेशन परिसरातील राजा बहाद्दुर मिल रस्ता परिसरात मोटारीतून आलेल्या चोरट्यांनी तरुणाला मारहाण करुन त्याच्याकडील दोन लाख रुपयांची सोनसाखळी हिसकावून नेल्याची घटना घडली. मोटारीतून पसार झालेल्या चोरट्यांविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, मोटारीतून आलेल्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाहतूक नियमभंगाची एपीके फाईल पाठवून पावणेतीन लाखाांची फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार २१ वर्षीय तरुण मूळचा बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे गावचा रहिवासी आहे. शनिवारी मध्यरात्री तो राजा बहाद्दुर मिल परिसरातून मित्रासोबत निघाला होता. त्या वेळी एका महागड्या मोटारीतून तिघे जण आले. त्यांनी तरुण आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्राला मारहाण केली. तक्रारदार तरुणाच्या गळ्यातील एक लाख ९५ हजार रुपयांची सोनसाखळी हिसकावून आरोपी मोटारीतून पसार झाले. मोटारीतून पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×