Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

अखिल भारतीय पाली साहित्य संमेलन २२ मार्च रोजी पुण्यात

अखिल भारतीय पाली साहित्य संमेलन २२ मार्च रोजी पुण्यात

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन

marathinews24.com

पुणे – पद्मपाणी फाउंडेशन आयोजित तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली व बौद्ध अध्ययन विभागाच्या सहकार्याने अखिल भारतीय पाली साहित्य संमेलन रविवारी, २२ मार्च २०२६ रोजी पुण्यातील सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन, भवानी पेठ (टिंबर मार्केट) येथे आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत हे संमेलन पार पडणार आहे.

पुणे येथे ‘दुसरी आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकाथॉन २०२६’ चे आयोजन – सविस्तर बातमी 

या संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा. रामदास आठवले यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमास भदंत हर्षबोधी महाथेरो, आंतरराष्ट्रीय धम्म प्रसारक मा. गगन मलिक, पुणे मनपाचे उपमहापौर मा. परशुराम वाडेकर, अखिल भारतीय पाली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. बिमलेंद्र कुमार आणि पुणे मनपाचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहणार आहेत.

संमेलनात देशभरातील पाली भाषा व बौद्ध अध्ययन क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये डॉ. महेश डेगावकर, अब्दुल मोमीन, डॉ. योजना भगत, धर्मदीप चावडे, डॉ. गौतम चाबुकस्वार आणि पद्मपाणी फाउंडेशनच्या संचालिका  सुवर्णा डंबाळे आदी मान्यवर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहभागी होणार आहेत.

पाली भाषा, बौद्ध साहित्य, संशोधन आणि सांस्कृतिक परंपरा यांवर विविध विषयांवर चर्चा व मार्गदर्शन करण्यात येणार असून पाली भाषेच्या प्रचार, प्रसार आणि संवर्धनासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

मागील वर्षी झालेल्या संमेलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. यंदाही या संमेलनाबाबत मोठी उत्सुकता असून १००० पेक्षा अधिक नागरिकांनी सहभागासाठी नोंदणी व चौकशी केल्याची माहिती आयोजकांनी दिली.

पाली भाषा व बौद्ध साहित्याविषयी रुची असलेल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने या संमेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन पद्मपाणी फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल डंबाळे, संचालिका सुवर्णा डंबाळे आणि आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×