Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

पुणे येथे ‘दुसरी आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकाथॉन २०२६’ चे आयोजन

ॲग्री हॅकाथॉन २०२६'

कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संशोधन; तांत्रिक परिवर्तनाला गती देण्यासाठी आयोजन

marathinews24.com

पुणे – जिल्हा प्रशासन आणि कृषी विभाग आणि प्रमुख कृषी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दुसऱ्या आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकाथॉन २०२६’ चे कृषी महाविद्यालय, पुणे येथे १५ ते १७ मे २०२६ या कालावधीत आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये अधिकाधिक स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

आदिवासी कलाकार सादर करणार रामायणावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम – सविस्तर बातमी 

कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संशोधन आणि तांत्रिक परिवर्तनाला गती देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. “शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करणे, उत्पादकता वाढविणे आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

ॲग्री हॅकाथॉन २०२६ चे मुख्य उद्दिष्ट कृषी क्षेत्रातील आव्हानांवर शाश्वत आणि प्रभावी उपाय शोधण्यासाठी देशभरातील तसेच परदेशातील संशोधक, स्टार्टअप्स, विद्यार्थी आणि प्रगतशील शेतकऱ्यांना एका व्यासपीठावर आणणे हे आहे. स्पर्धकांनी सहभागी होण्याकरिता मृदा आरोग्य आणि व्यवस्थापन, स्मार्ट जल व्यवस्थापन आणि ऑटोमेशन, शेती यांत्रिकीकरण (कृत्रिम बुद्धीमत्ता आणि रोबोटिक्स), कृषी प्रक्रिया आणि मूल्य साखळी, अक्षय ऊर्जा आणि कृषी-कचरा व्यवस्थापन, पीक संरक्षण आणि कीड व्यवस्थापन, हवामान-अनुकूल आणि डिजिटल शेती, प्रभावी कृषी प्रशासनासाठी एआय,तंत्रज्ञान आधारित हस्तक्षेप, प्रभावी आपत्ती व्यवस्थापन, पीक नुकसानीचे मूल्यांकन आणि भाकितासाठी एआय, तंत्रज्ञान, साधने प्रमुख विषयांवर आपले उपाय सादर करता येणार आहे.

उद्योजक, शासन आणि शैक्षणिक संस्थांनी एकत्र येऊन शेतीच्या भविष्यासाठी स्वस्त आणि नाविन्यपूर्ण उपाय तयार करावेत, यावर या हॅकाथॉनचा भर असणार आहे. या स्पर्धेत विजेत्याला २५ लाख रुपये आणि उपविजेत्याला १५ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. याशिवाय निवडक प्रकल्पांना ‘इन्क्युबेशन’ (मार्गदर्शन) आणि निधी मिळवून देण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

पुणे ॲग्री हॅकाथॉन हे झपाट्याने कृषी-नवोन्मेषाचे सर्वात मोठे व्यासपीठ म्हणून उदयास येत असून, यामुळे पुणे शहर कृषी तंत्रज्ञान आणि उद्योजकतेचे केंद्र होण्यास मदत होणार आहे. अधिक माहिती व नोंदणीसाठी https://www.puneagrihackathon.com/ संकेतस्थळाला भेट द्यावे, असे आवाहन डुडी यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×