Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

पुण्यात १५ वर्षीय मुलीवर तिघांकडून अत्याचार, दोघांनी केला विनयभंग

पुण्यात १५ वर्षीय मुलीवर तिघांकडून अत्याचार, दोघांनी केला विनयभंग

भारती विद्यापीठ परिसरात घडली घटना

marathinews24.com

पुणे – अल्पवयीन मुलीला तिघा तरुणांनी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना भारती विद्यापीठ परिसरात घडली आहे. तसेच दोघांनी तिच्याशी अश्लील चाळे केल्याचे उघडकीस आले आहे. मागील साडे तीन महिन्यांत हा प्रकार घडला असून,
आरोपींनी मुलीला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केला आहे. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.

शेअर ट्रेडींगमधील गुंतवणूक पडली ७० लाखांना – सविस्तर बातमी 

आशुतोष विजयकुमार पाटील (वय २५), नागेश सुर्यवंशी (वय २१), गौरव माने (वय २०) यांना बलात्कारप्रकरणी तर प्रीतम जगताप याला विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक केली आहे. एक आरोपी पसार झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे कुटूंब भारती विद्यापीठ भागात राहण्यास आहे. आरोपी त्याच परिसरातील असून, गेल्या साडे तीन महिन्यांत त्यांनी पिडीत मुलीच्या अल्पवयीन असल्याचा फायदा घेतला. आरोपी आशुतोष, नागेश, गौरव यांनी मिळून तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केला. आरोपी प्रीतमने मुलीसोबत अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला. तसेच पाचव्या आरोपीने तिच्याशी व्हिडीओ कॉल करून कपडे काढण्यास भाग पाडून तिचा विनयभंग केला आहे.
दरम्यान, याप्रकरणात मंगळवारी गुन्हा नोंदवण्यात आला असून, त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणात चौघांना अटक केली आहे.

१५ वर्षीय मुलीवर अत्याचार प्रकरणातील आरोपी एकमेकांच्या ओळखीतील आहेत. तिघांनी मुलीला पकडून तिच्याशी अश्लील चाळे केले आहेत. अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक थोरात या करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×