Breking News
जिल्हा परिषद सदस्याची विकासात्मक दृष्टी ठरेल ग्रामविकासाला नवी चालना देणारी सुदृढ स्नायू, सुडौल शरीरासाठी ‘वंडर एक्सॉन’ तंत्रज्ञान प्रभावीपुण्यात सराईत गुंडाचा मित्रांकडून खूनपुणे पोलीस नियंत्रण कक्षातील गैरहजरी भोवलीतब्बल ६० लाखांचा गुटखा जप्तउष्णतेच्या लाटेपासून पशुधनाचा बचाव करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबिनव्याजी कर्जाचे आमिष दाखवून ग्राहकांची फसवणूकग्राहकांच्या तक्रारीची गांर्भीयाने दखल घेत प्राधान्याने सोडावाव्यातविवाहितेला प्रेमात फसवले, अपमानित झाल्याने महिलेने केली आत्महत्यापॉर्न व्हिडिओ का पाठवले, पुण्यात बतावणीने जेष्ठाला ३५ लाखांना गंडा

हळदीच्या पाकिटात गांजा लपवून विक्री

हळदीच्या पाकिटात गांजा लपवून विक्री

बाणेर पोलिसांकडून दोघांना अटक

marathinews24.com

पुणे – हळदीच्या पाकिटातून गांजा विक्री करणाऱ्या दोघांना बाणेर पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून १६ किलो गांजासह परदेशी चलन जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी अभिषेक बोरसे आणि अक्षय बोरसे (दोघे रा. पिंपरी-चिंचवड) यांना अटक करण्यात आली आहे.

पुण्यात कबुतर चोरीच्या संशयावरून तरुणाचा खून – सविस्तर बातमी 

आरोपी बोरसे हे शहराच्या वेगवेगळ्या भागात गांजा विक्री करत होते. संशय येऊ नये म्हणून ते गांजा हळदीच्या पाकिटात लपवून विक्री करत होते. गांजा विक्रीबाबत कोणाला संशय येऊ नये म्हणून दोघे जण एका खासगी कंपनीत काम करत होते. बाणेर परिसरात दोघे जण दुचाकीवरुन येणार असून, ते गांजा विक्री करणार असल्याची माहिती बाणेर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून दोघांना पकडले. पोलिसांनी दोघांची झडती घेतली. त्यांच्याकडे असलेल्या पिशवीत हळदीची पाकिटे सापडली. तपासणीत पाकिटात गांजा लपविल्याचे उघडकीस आले.

पोलिसांनी त्यांच्याकडून तीन किलो गांजा जप्त केला. आरोपी बाेरसे यांची चौकशी करण्यात आली. तेव्हा दोघांनी पिंपरी चिंचवडमधील घरात गांजा लपवून ठेवल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घराची झडती घेतली. घरातून पोलिसांनी १३ किलो गांजा जप्त केला. आरोपींनी गांजा कोठून आणला, तसेच ते कोणाला विक्री करणार होते ?, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अमली पदार्थ तस्करांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. आठवडापूर्वी लोणी काळभोर भागात एकाकडून गांजा जप्त करण्यात आला होता.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×