पुण्यात कबुतर चोरीच्या संशयावरून तरुणाचा खून

पुण्यात कबुतर चोरीच्या संशयावरून तरुणाचा खून

टोळक्याच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू; वानवडीतील घटना

marathinews24.com

पुणे – कबुतर चोरीच्या संशयावरून पाच जणांनी तरुणाचा पाठलाग करून त्याला लाकडी बॅटसह लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीत १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.१७) मध्यरात्री अडीचच्या सुमारास वानवडी परिसरात घडली आहे. रूपेश धनराज शिंदे (वय १९, रा. बोराटे वस्ती, मोशी, पिंपरी चिंचवड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी धनराज शिंदे यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पाच जणांविरोधात खूनाचा गुन्हा नोंद केला आहे.

एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांकडून १० लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांच्या माहितीनुसार, रूपेश व त्याचा मित्र अजय टिंगरे हे मंगळवारी रात्री अडीचच्या सुमारास हडपसरमधून मोशीच्या दिशेने दुचाकीने जात होते. दोघेही हडपसरमधील शंकरमठ येथे थांबले होते. तेथून ते पुन्हा दुचाकीने जात असताना ते पवार एन्क्लेव्ह सोसायटीसमोर थांबले होते. त्याठिकाणी ते कबुतराच्या पेटीजवळ गेले असता, कुत्रे भुंकण्याचा आवाज आला. त्यामुळे दोघेही पळू लागले. चोरट्यांच्या संशयाने पाच जणांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. काही अंतरावर रूपेश शिंदे पळताना खाली कोसळला.

पाच जणांनी त्याला पकडून लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. त्याला लाकडी बॅटनेही मारहाण केली. या मारहाणीत रूपेशचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कबूतर चोरीच्या संशयावरून टोळक्याने रूपेशला मारहाण केली. अधिक तपास वानवडी पोलीस करत आहेत. अद्याप याप्रकरणात कोणालाही अटक केलेली नाही.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×