एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांकडून १० लाखांची फसवणूक

ज्येष्ठ नागरिकाची १ कोटी १७ लाखांची फसवणूक

सायबर चोरट्यांकडून फसवणुकीचा  प्रकार

marathinews24.com

पुणे – एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांकडून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत ज्येष्ठ नागरिकासह दोघांची दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सनसिटी रस्त्यावर तरुणाच्या खून; ३ अल्पवयीन ताब्यात –  सविस्तर बातमी 

सिंहगड रस्ता परिसरातील तरुणाच्या मोबाइलवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांनी ७ लाख ६६ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत तरुणाने नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर एपीके फाईल पाठविली होती. एपीके फाईल उघडल्यानंतर चोरट्यांनी तरुणाच्या बँक खात्यातून सात लाख ६६ हजार रुपये लांबविले. चोरट्यांनी तरुणाच्या खात्यातील रक्कम दुसऱ्या खात्यात वळविली. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तरुणाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम शेटे तपास करत आहेत.

बिबवेवाडी भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी दोन लाख २२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइल क्रमांकावर एका विमान कंपनीच्या नावे बनावट संदेश पाठविला होता. संबंधित संदेश असलेली एपीके फाईल उघडल्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून दोन लाख २२ हजार रुपयांची रक्कम चोरून नेली. चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्याला जोडलेला मोबाइल क्रमांक हॅक करुन खात्यातून रोकड काढून घेतल्याचे उघडकीस आले आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सूरज बेंद्रे तपास करत आहेत.

थकीत वीज, गॅस देयकाची बनावट एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांनी अनेकांची फसवणूक केली आहे. नागरिकांनी अनोळखी क्रमांकावरुन आलेली एपीके फाईल उघडू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×