नांदेड सिटी पोलिसांत गुन्हा दाखल, सायबर चोरट्यांचा शोध सुरू
marathinews24.com
पुणे – लष्करासाठी साहित्य पुरविण्याचे आहे, अशी बतावणी करुन सायबर चोरट्यांनी एका तरुणाची ९ लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत एका तरुणाने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरटीओकडे नोंदणी न करता बसमधून प्रवासी वाहतूक – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण हा सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात राहायला आहे. चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. लष्कराला साहित्य पुरवायचे आहे. या व्यवसायात गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल, असे आमिष दाखवून चाेरट्यांनी त्याला जाळ्यात ओढले. तरुणाने चोरट्यांच्या खात्यात पैसे जमा केले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांचे मोबाइल क्रमांक बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक प्रसाद राऊत तपास करत आहेत.





















