Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

कोण होणार मस्साजोगचा कारभारी ; २८ एप्रिलला सरपंचपदाची पोटनिवडणूक

कोण होणार मस्साजोगचा कारभारी ; २८ एप्रिलला सरपंचपदाची पोटनिवडणूक

गावांमध्ये गटातटांचे राजकारण ; बिनविरोध होण्याची कमी शक्यता

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – राज्यात गाजलेल्या मस्साजोगचे माजी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतररिक्त झालेल्या सरपंच पद उपसरपंचांकडे सोपवण्यात आले होते. मात्र सरपंच पदासाठी राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर केला आहे. २८ एप्रिल रोजी मतदान पार पडणार असून, दुसऱ्याच दिवशी म्हणजेच २९ एप्रिल रोजी निकाल घोषित केला जाणार आहे. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर मस्साजोग सरपंच पदाचा नवीन कारभार कोण सांभाळणार असा सवाल उपस्थित होऊन याकडे आता संपूर्ण बीड जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे.

गुढीपाडवा-पट वाढवा अभियानातून शाळा प्रवेशोत्सवाला चालना : शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे 

दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख सध्या गावात सक्रिय असून, त्यांच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला किंवा पत्नीला उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, ही निवडणूक पूर्णतः बिनविरोध करून गावकऱ्यांकडून संतोष देशमुख यांना आदरांजली वाहिली जाणार, की त्यांच्या वारसदारा विरोधात अन्य कोणी उमेदवार उभा राहणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे .

२८ एप्रिल रोजी प्रत्यक्ष मतदान

मस्साजोग सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अधिकृत कार्यक्रमानुसार, ७ ते १३ एप्रिल या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडणार असून, १५ एप्रिल रोजी या अर्जाची छाननी केली जाईल. इच्छुक उमेदवारांना आपले अर्ज मागे घेण्यासाठी १७ एप्रिल पर्यंतची मुदत देण्यात आली असून, या सर्व प्रशासकीय प्रक्रियेनंतर २८ एप्रिल रोजी प्रत्यक्ष मतदान पार पडेल आणि २९ एप्रिल रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन गावाचा नवा कारभारी कोण, याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

संतोष देशमुखांची ९ डिसेंबर रोजी अपहरण करून निघृण हत्या

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची गेल्या वर्षी ९ डिसेंबर रोजी अपहरण करून निघृण हत्या करण्यात आली होती. एका कंपनीकडून होणाऱ्या खंडणी वसुलीला विरोध केल्यामुळेच ही हत्या झाल्याचा प्राथमिक आरोप आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करून राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने २७ फेब्रुवारी रोजी बीड जिल्हा न्यायालयात १२०० हून अधिक पानांचे विस्तृत दोषारोपपत्र दाखल केले असून, यामध्ये देशमुख यांची हत्या आणि त्याशी संबंधित अन्य दोन प्रकरणांचा तपशीलवार समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मीक कराडसह सुदर्शन घुले, विष्णू चाटे, जयराम चाटे, महेश केदार, सुधीर सांगळे आणि प्रतीक घुले या आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणातील आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे मात्र त्याचा शोध अद्याप पोलीस प्रशासनाला लागत नसल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहेत .

सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध होणे अशक्य

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदाच्या जागेवर देशमुख कुटुंबातील सदस्य बिनविरोध विराजमान होणार का अन्य गावातील व्यक्ती निवडून येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून गावांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. गावातील राजकारण हे गटतटाचे राजकारण असल्याने सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांकडून कॅार्नर बैठका सुरू झाल्या आहेत व गावांमध्ये दोन ते तीन गट असल्यामुळे मस्साजोग गावचे सरपंच पदासाठी बिनविरोध निवडून देणे अशक्य असल्याचे बोलले जात आहे .यामुळे आता सरपंच पदाचा नवा कारभारी कोण ? निवडणूक होणार का? बिनविरोध निवडून देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार असून याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×