Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

तब्बल दीड काेटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण

हातउसने पैशांच्या वादातून पिस्तूल रोखून मारहाण

पुण्यात स्वारगेट मधील घटना

marathinews24.com

पुणे – तब्बल दीड कोटीच्या खंडणीसाठी गुलटेकडी परिसरातून एका व्यापाऱ्याचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत व्यापाऱ्याच्या पत्नीने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील चंदननगर भागात अल्पवयीन मुलींवर बलात्कार – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यापारी गुलटेकडीतील महर्षीनगर भागात राहायला आहे. २४ मार्च रोजी सकाळी नेहमीप्रमाणे तक्रारदार महिलेचे पती दुकानात गेले. दुपारी ते घरी जेवण करण्यासाठी यायचे. मात्र, दुपारी जेवण करण्यासाठी पती घरी आले नाहीत. त्यानंतर दुपारी एकच्या सुमारास समाज माध्यमातील संपर्क सुविधेचा वापर करुन आरोपींनी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. अनोळखी मोबाइल क्रमांकावरुन महिलेच्या पतीने संपर्क साधला. ‘माझे अपहरण करण्यात आले आहे. माझ्या जिवाला धोका आहे. मला डांबून ठेवले आहे’, असे व्यापाऱ्याने पत्नीला सांगितले. अपहरण करणाऱ्या आरोपींनी पत्नीकडे दीड कोटी रुपयांची खंडणी मागितली. खंडणी दिल्यानंतर पतीची सुटका करतो, अशी धमकी दिली. या घटनेनंतर घाबरलेल्या पत्नीने स्वारगेट पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×