Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

टास्कचे आमिष महागात, तरूणाची २४ लाखांची फसवणूक

जमीन खरेदीत गुंतवणुकीच्या आमिषाने अडीच कोेटींची फसवणूक

कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – टास्क पुर्ण करण्याच्या नादात ३५ वर्षीय तरूणाने तब्बल २४ लाख रूपये गमावले आहेत. सायबर चोरट्यांनी संबंधित तरूणाला लिंक पाठवून टास्क पुर्ण करण्याचे सांगून पैशांचे आमिष दाखवले होते. त्यानंतर तरूणाने सायबर चोरट्यांच्या आमिषाला बळी पडून तब्बल २४ लाख रूपये वर्ग केले आहेत. ही घटना २३ सप्टेंबर २०२५ ते २० फेबु्रवारी २०२६ कालावधीत कोथरूडमधील शास्त्रीनगरात घडली आहे. याप्रकरणी तरूणाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

येरवड्यात दोन गटात राडा, तुफान हाणामारी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण कोथरूडमधील शास्त्रीनगरात राहायला आहे. २३ सप्टेंबर २०२५ रोजी सायबर चोरट्यांनी त्याला टेलीग्राम अ‍ॅपवर लिंक पाठवली. टास्क पुर्ण केल्यास पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवले. आमिषाला भुलून तरूणाने संबंधित खात्यात रक्कम वर्ग केली. तब्बल २४ लाख रूपये पाठवल्यानंतर त्याला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर तरूणाने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी मोबाइल धारकासह टेलीग्रामधारकाविरूद्ध गुन्हा दाखल आहे. त्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×