Breking News
मराठा लाइट इन्फंट्रीच्या १६ भैरव बटालियनला दगडूशेठ गणपतीची पंचधातूची मूर्ती सुपूर्दपुण्यातील व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजचे दोघे संचालक फरारपुण्यात भूजल सर्वेक्षण विभागातील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडलेबेलसर टोलनाक्यावर स्थानिकांना टोलमाफी मिळावीजिल्हाधिकारी यांच्याकडून आषाढी वारीसाठी पालखी मार्गावरील सोयीसुविधांचा आढावाजिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्नअल्पवयीनांमधील व्यसनाधिनता रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हानपालघर अनधिकृत फटाका कारखाना स्फोट प्रकरणपुणे ग्रोथ हब प्रकल्पांचा राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. नितीन करीर यांच्याकडून आढावाखुनासाठी पिस्तुल बाळगणाऱ्या सराईताला अटक

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार करणारा गजाआड

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार करणारा गजाआड

पुणे महापालिकेत नोकरी लागल्याने ठरवले दुसरीशी लग्न

marathinews24.com

पुणे – लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने तरुणीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर सहा वर्षांनी महापालिकेत नोकरी लागल्याने त्याने दुसऱ्या मुलीशी लग्न ठरवले. ही बाब पीडितेला समजताच तिने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. यावरून चतु:श्रृंगी पोलिसांनी आरोपीविरोधात फसवणुकीसह बलात्कार व अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. प्रथमेश सुनील देशमुख (वय २९, रा. सुधा रेसिडेन्सी, पिंपळे निलख) असे आरोपीचे नाव आहे.

नर्‍हे, हडपसर परिसरात घरफोडी; २ लाखांचा ऐवज चोरीला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेची आणि आरोपी प्रथमेश देशमुख याची ओळख २०१८ मध्ये सोशल मीडियावर झाली. एकाच शहरात राहत असल्याचे समजल्यानंतर त्यांनी एकमेकांना भेटण्यास सुरूवात केली. भेटीदरम्यान आरोपी प्रथमेशने पीडितेला आपण लग्न करू म्हणत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर वारंवार लग्नाचे आमिष दाखवत प्रथमेशने पीडितेशी शारीरिक संबंध ठेवले. २०२२ मध्ये दोघांच्या घरच्यांनी एकत्र येत टिळ्याचा कार्यक्रम देखील केला. त्यानंतर आरोपीचा मामाने मोठे लग्न
करण्याच्या कारणावरून त्यांचे लग्न मोडले. त्यानंतरही प्रथमेशने पीडितेला मंदिरात घेऊन जात लग्न केले. तसेच घरच्यांचा होकार येईपर्यंत आपण वेगवेगळे राहू असे सांगत पुन्हा शारीरिक संबंध ठेवले.

त्यानंतर २०२५ मध्ये आरोपी प्रथमेश देशमुख याला पुणे महापालिकेत नोकरी लागली. त्यामुळे त्याने पीडितेला तुला माझ्या घरी यायचे असेल तर मोठे लग्न करून द्यावे लागेल असे सांगितले.

पीडितेने त्याला देखील होकार दिलेला असताना आरोपी प्रथमेशचे दुसऱ्याच मुलीशी लग्न ठरल्याचे पीडितेला १९ मार्च रोजी समजले. यानंतर पीडितेने चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात जात आरोपी प्रथमेश देशमुख याच्या विरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक स्नेहल पाटील या करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×