Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

कोथरुड आणि कोंढवा परिसरात घरफोडी

सिंहगड रस्ता भागात भरदिवसा घरफोडी

संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील कोथरुड आणि कोंढवा परिसरात घरफोडीच्या घटना वाढल्या असून, अज्ञात चोरट्यांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकत रोख रक्कम व मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला आहे. या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून, आरोपी अद्याप फरार आहेत.

जेष्ठाला जादा परताव्याचे आमिष पडले १ कोटींना – सविस्तर बातमी 

कोथरुडमधील प्रीतमनगर येथील बिल्डिंग दोनमधील एका सदनिकेत १८ ते २३ मार्च २०२६ दरम्यान घरफोडीची घटना घडली. याप्रकरणी अशुतोष श्रीपाद आष्टेकर (वय ३६) यांनी तक्रार दिली आहे. अज्ञात चोरट्याने दरवाजाची कडी तोडून व लॉक उचकटून घरात प्रवेश केला. यावेळी सुमारे ५० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम चोरीस गेली.

दरम्यान, एआरएआई टेकडीवरील म्हातोबा देवस्थान येथेही चोरीची घटना उघडकीस आली आहे. २१ मार्च ते २२ मार्चदरम्यान घडलेल्या या प्रकारात चोरट्यांनी मंदिराच्या लोखंडी दरवाज्याचे पट्टे कापून आत प्रवेश केला. रोहीदास काळुराम सुतार (वय ६१) यांनी याबाबत तक्रार नोंदवली आहे. मंदिरातील धातूच्या वस्तू, पितळी साहित्य आणि सुमारे ४९ हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली.

तसेच, येवलेवाडी परिसरातील कात्रज-कोंढवा रस्त्यावर एका दुकानातही चोरी झाली. २४ मार्चच्या रात्री ते २५ मार्च सकाळदरम्यान अज्ञाताने दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला आणि कॅश काउंटरमधून २१ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेण्यात आले. या प्रकरणी अथर्व युवराज गाडवे (वय २८) यांनी तक्रार दिली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×