Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

विद्यार्थ्यांवर भारताला ‘जगाचे गुरुस्थान’ मिळवून देण्याची जबाबदारी – पांडुरंग बलकवडे

विद्यार्थ्यांवर भारताला ‘जगाचे गुरुस्थान’ मिळवून देण्याची जबाबदारी – पांडुरंग बलकवडे

जागतिक रंगभूमी दिनानिमित्त सदानंद अंचवल स्मृती पुरस्कारांचे वितरण

marathinews24.com

पुणे – एकेकाळी सुवर्ण भारत म्हणून ओळखला जाणारा देश पुन्हा नव्याने घडवून त्याला जगाचे गुरुस्थान प्राप्त करून देण्याची जबाबदारी आजच्या विद्यार्थी वर्गावर आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी केले. विद्यार्थ्यांनी कोणत्याही क्षेत्रात करिअर घडवताना राष्ट्रनिष्ठा आणि कामावरील निष्ठा अबाधित ठेवावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली वाहतूक व्यवस्थापन आराखडा बैठक संपन्न – सविस्तर बातमी 

रमणबाग प्रशालेत जागतिक रंगभुमी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बलकवडे आणि उद्योजक डॉ. दिलीप देशपांडे यांच्या हस्ते सदानंद अचवल यांच्या स्मरणार्थ नाट्य क्षेत्रातील उल्लेखनीय विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. हे पुरस्कार अमेरिकास्थित अनिल प्रयाग यांनी प्रायोजित केलेले आहेत.

यावेळी ‘नाट्य आराधना’ पुरस्काराने इयत्ता सहावीतील अमोघ किरण कुलकर्णी, तर ‘नाट्य प्रेरणा’ पुरस्काराने इयत्ता दहावीतील गौरव विशाल जगताप यांचा सन्मान करण्यात आला. तसेच राज्य नाट्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवलेल्या ‘माय सुपर हिरो’ या नाटकातील विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात बोलताना बलकवडे यांनी कला ही व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यावश्यक असल्याचे सांगितले. “कला माणसाचे जीवन समृद्ध करते आणि ती प्रभावी संवादाचे साधन आहे. भारताला ६४ कलांची परंपरा लाभली असून नव्या पिढीने ती अधिक समृद्ध करावी,” असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. दिलीप देशपांडे यांनी नाटकाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “नाटक हा समाजाचा आरसा आहे. समाजातील चांगल्या-वाईट गोष्टींचे प्रभावी चित्रण नाटकातून करता येते. ही जिवंत कला असल्याने कलाकारांकडे समयसूचकता आणि एकाग्रता अत्यावश्यक असते.”

कार्यक्रमाची सुरुवात तनय नाझीरकर यांनी सादर केलेल्या नांदीने झाली. उपमुख्याध्यापक महेश जोशी यांनी प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले. अचवल यांचे वर्गमित्र दिलीप परदेशी यांनी अचवल यांच्या आठवणींना उजाळा दिला, तर दीप्ती डोळे यांनी सूत्रसंचालन केले.

या कार्यक्रमाला शाळा समितीचे अध्यक्ष डॉ. शरद आगरखेडकर, पर्यवेक्षिका अंजली गोरे, मंजुषा शेलूकर, नाट्यछंद विभागाचे प्रमुख रवींद्र सातपुते यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि १९६३ च्या मॅट्रिक बॅचमधील अचवल यांचे अनेक वर्गमित्र उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×