Breking News
जिल्हा परिषद सदस्याची विकासात्मक दृष्टी ठरेल ग्रामविकासाला नवी चालना देणारी सुदृढ स्नायू, सुडौल शरीरासाठी ‘वंडर एक्सॉन’ तंत्रज्ञान प्रभावीपुण्यात सराईत गुंडाचा मित्रांकडून खूनपुणे पोलीस नियंत्रण कक्षातील गैरहजरी भोवलीतब्बल ६० लाखांचा गुटखा जप्तउष्णतेच्या लाटेपासून पशुधनाचा बचाव करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबिनव्याजी कर्जाचे आमिष दाखवून ग्राहकांची फसवणूकग्राहकांच्या तक्रारीची गांर्भीयाने दखल घेत प्राधान्याने सोडावाव्यातविवाहितेला प्रेमात फसवले, अपमानित झाल्याने महिलेने केली आत्महत्यापॉर्न व्हिडिओ का पाठवले, पुण्यात बतावणीने जेष्ठाला ३५ लाखांना गंडा

वैमनस्यातून तरुणाचा खुनाचा प्रयत्न

वैमनस्यातून तरुणाचा खुनाचा प्रयत्न

चौघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – वैमनस्यातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना कात्रजमधील आंबेगाव भागात घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल शिवाजी शेळके (वय २६, रा. भोलेनगर, आंबेगाव खुर्द) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी सादर शेख (वय १९), राजप्पा यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शेळके याने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तुळशीबागेत महिलेचे दीड लाखांचे दागिने चोरी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेळके याची आराेपींशी भांडणे झाली होती. २६ मार्च रोजी तो आंबेगावमधील भिमाई चौकातून मित्रासोबत निघाला होता. त्या वेळी आरोपींनी शेळके आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्राला अडवले. दोघांना शिवीगाळ केली. आरोपींनी शेळके याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×