Breking News
जिल्हा परिषद सदस्याची विकासात्मक दृष्टी ठरेल ग्रामविकासाला नवी चालना देणारी सुदृढ स्नायू, सुडौल शरीरासाठी ‘वंडर एक्सॉन’ तंत्रज्ञान प्रभावीपुण्यात सराईत गुंडाचा मित्रांकडून खूनपुणे पोलीस नियंत्रण कक्षातील गैरहजरी भोवलीतब्बल ६० लाखांचा गुटखा जप्तउष्णतेच्या लाटेपासून पशुधनाचा बचाव करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबिनव्याजी कर्जाचे आमिष दाखवून ग्राहकांची फसवणूकग्राहकांच्या तक्रारीची गांर्भीयाने दखल घेत प्राधान्याने सोडावाव्यातविवाहितेला प्रेमात फसवले, अपमानित झाल्याने महिलेने केली आत्महत्यापॉर्न व्हिडिओ का पाठवले, पुण्यात बतावणीने जेष्ठाला ३५ लाखांना गंडा

व्यावसायिक स्पर्धेतून उपाहारगृह चालकासह दोघांवर शस्त्राने वार

नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुण्यात महर्षीनगर भागातील घटना

marathinews24.com

पुणे – खाद्यपदार्थ व्यवसायातील स्पर्धेतून उपहारागृह चालकासह दाेघांवर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना महर्षीनगर भागात घडली. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात एकाचे मनगट तुटून वेगळे झाले. भरदिवसा दोघांवर हल्ला करण्यात आल्यची घटना घडल्यानंतर परिसरात घबराट उडाली. किशोर राजू बनसोडे (वय २९), प्रसाद राजेंद्र आजुरे (वय २८, दोघे रा. प्रेमनगर वसाहत, मार्केट यार्ड) अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. याबाबत सुनील राजू बनसाेडे (वय २६) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोम्मीराजा मुथ्थुराज थेवर (वय २४, रा. प्रेमनगर वसाहत, मार्केट यार्ड) याच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गॅस एजन्सीचा पुरवठा आणि वितरण तात्काळ प्रभावाने बंद ; नियमभंगावर जिल्हा प्रशासनाची कारवाई – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बनसोडे यांचे महर्षीनगर परिसरात व्यंकटेश्वरा अमृततुल्य आणि व्यंकटेश्वरा वडेवाले उपाहारगृह आहे. आराेपी थेवर हा बनसाडे यांच्या उपाहारगृहासमोर दाक्षिणात्य खाद्यपदार्थ विक्रीची गाडी लावायचा. बनसोडे आणि थेवर यांच्यात व्यवसायावरुन वाद झाले होते. थेवर हा बनसोडे यांच्या उपाहारगृहासमोर गाडी लावत होता. त्यामुळे बनसोडे यांनी त्याला गाडी लावू नको, असे सांगितले होते. या कारणावरुन थेवर आणि बनसोडे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. शनिवारी दुपारी पावणेएकच्या सुमारास किशोर बनसोडे आणि प्रसाद आजुरे उपाहारगृहात होते. आरोपी थेवर आणि त्याच्याबरोबर तीन साथीदार तेथे आले. त्यांच्याकडे तीक्ष्ण शस्त्रे, तसेच दांडके होते.

वादातून आरोपींनी बनसाेडे आणि आजुरे यांच्यावर शस्त्राने वार करण्यास सुुरुवात केली. आजुरे याने वार हातावर झेलला. त्याचे मनगट तुटले. दोधे जण गंभीर जखमी झाला. भरदिवसा दाेघांवर हल्ला झाल्यानंतर महर्षीनगर परिसरात घबराट उडाली. बनसोडे आणि आजुरे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम, सहायक निरीक्षक अभिजित पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या आरोपींचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×