कौटुंबिक वादातून मारहाण केल्यामुळे पत्नीचा गर्भपात

पीएमपीएल प्रवासी महिलांचे दीड लाखांचे दागिने लांबविले

पर्वती पती, दीराला अटक

marathinews24.com

पुणे – गर्भवती असलेल्या महिलेला डॉक्टरांनी विश्रांती घेण्यास सांगितले. त्यामुळे तिने मी माहेरी जाते असे कुटुंबाला सांगितले. त्यावरुन त्यांच्यात वाद झाल्याने पती व दीराने महिलेला मारहाण केली.

पुणे एसटी प्रवासात जेष्ठेकडील ऐवज चोरीला – सविस्तर बातमी

मारहाणीमुळे तिचा गर्भपात झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पर्वती पोलिसांनी पती व दीराला अटक केली आहे. ऋतिक साळुंके (वय २४) आणि विकी साळुंके (दीर, वय २५, दोघेही रा. साने गुरुजीनगर, सदाशिव पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सोनु ऊर्फ लता साळुंके यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत २४ वर्षीय महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना २९ मार्च २०२६ रोजी घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौटुंबिक वादातून मागील दोन वर्षांपासून पीडित महिलेचा कुटुंबीय शारीरीक व मानसिक छळ करत होते. संबंधित महिला गर्भवती असल्याने त्यांना त्रास होत होता. तिला डॉक्टरांकडे नेण्यात आले होते. त्यांना बाळंतपण होईपर्यंत विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यामुळे महिला बाळंतपणाला माहेरी विश्रांतीसाठी आताच जाते, असे म्हणाल्या. यावरुन त्यांच्यात वाद झाला. त्यात पती व दिराने मारहाण केली. त्यात त्या पोटावर पडल्याने त्यांचा गर्भपात झाला. पर्वती पोलिसांनी दोघांना अटक केली. – पोलीस उपनिरीक्षक शेख तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×