काळजात आठवण आणि मानेवर टॅटू; भावाच्या न्यायासाठी धनंजय देशमुखांचा अनोखा लढा

धनंजय देशमुखांनी ‘सत्य-विरा-युद्ध’ नावांसह कोरली भावाची छबी

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – आदर्श कामातुन गावाची ओळख राज्यभर निर्माण करणारे आणि गावाला विविध प्रकारचे पुरस्कार मिळवून देणारे बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येला १६ महिने पूर्ण झाले आहेत. न्यायासाठी भाऊ संतोष देशमुखांचे धाकटे भाऊ धनंजय यांनी काळजात आठवण आणि मानेवर टॅटू मानेवर गोंदवून अनोखा लढा सुरू केला आहे.

पल्स वैद्यकीय परिषद यशस्वी; आरोग्य क्षेत्रास परिवर्तनाची नवी दिशा- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ – सविस्तर बातमी

भावाच्या हत्येचा बदला न्यायाने घेण्यासाठी धनंजय देशमुखांनी आपल्या मानेवर ‘सत्य-विरा-युद्ध’ आपल्या मुलासह पुतण्याच्या नावांसह दिवंगत संतोष देशमुखांची प्रतिमा कोरली आहे. त्यामुळे दिवंगत संतोष देशमुख यांच्या भाऊ धनंजय देशमुख यांचे सोशल मीडियावर सर्वत्र कौतुक होत आहे.।बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या ९ डिसेंबर रोजी अपहरण करून झाली होती.

संतोष यांना न्याय मिळावा यासाठी भाऊ धनंजय देशमुख आणि मस्साजोगकर लढा देत आहेत. दरम्यान त्यांनी भाऊ संतोष देशमुखांचा फोटो टॅटूच्या माध्यमातून मानेवर मानेवर काढला आहे. त्यासोबत सत्य-विरा-युध्द असे नावं कोरले आहेत जी त्यांच्या मुलांची नावं आहेत. टॅटू काढलेला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.सरपंच संतोष देशमुखांना न्याय मिळालाच पाहिजे अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.

माझा भाऊ माझे सर्वस्व होता आणि आहे. माझ्या प्रत्येक क्षणात आठवणीत माझा भाऊ आहे. माझ्या भावात मी माझे मुल आणि माझा पुतण्या पाहतो म्हणुन मी टॅटूच्या खाली मुलगा आणि पुतण्या यांची नावे टाकली आहेत.

धनंजय देशमुख, भाऊ

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×