Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

देवदर्शनावरून परतताना काळाचा घाला

दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

दिवे घाटात दुचाकीस्वार वडिलांसह मुलीचा मृत्यू

marathinews24.com

पुणे – देवदर्शनावरून परतत असताना भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार वडिलांसह मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दिवे घाटात सोमवारी मध्यरात्री घडली. अपघातात दुचाकीवरील आठ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली.

भोंदू अशोक खरात याच्या सीएची एसआयटीमार्फत  करा – सविस्तर बातमी 

दुचाकीस्वार सुंदर कैलास गंगावणे (वय ३८), त्यांची मुलगी चौकशीअनन्या (वय १२, दोघे रा. उंड्री, कात्रज – कोंढवा रस्ता) अशी मृत्युुमुखी पडलेल्यांची नावे आहेत. अपघातात सोहम कैलास गंगावणे (वय ८) जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी ट्रकचालक हनुमंत बाबूराव मलकापुरे (वय ३२, रा. नागेवाडी, ता. शिरूर अनंतपाळ, जि. लातूर) याला अटक करण्यात आली. याबाबत अश्विनी उत्तम पवार (वय ३०, रा. कमलविहार सोसायटी, धनकवडी) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अश्विनी पवार यांचे मामेभाऊ सुंदर गंगावणे हे मुलगी अनन्या आणि मुलगा सोहम यांना घेऊन दुचाकीवर रविवारी (२९ मार्च) जेजुरीला दर्शनासाठी गेले होते. पुणे-सासवड रस्त्यावरून दुचाकीस्वार गंगावणे आणि मुले सव्वाबाराच्या सुमारास निघाले होते. दिवे घाटात भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. अपघातात सुंदर गंगावणे, अनन्या आणि सोहम गंभीर जखमी झाले.

माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक ढावरे, देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. ‘गंभीर जखमी झालेले सुंदर, अनन्या, सोहम यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सोहम याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रकचालकाला अटक करण्यात आली आहे’, अशी माहिती फुरसुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक देशमुख तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×