Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

पुण्यात महिला पत्रकाराशी गैरवर्तन; रीलस्टार संतोष पंडितवर गुन्हा दाखल

पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – महिला पत्रकाराशी अर्वाच्य भाषा वापरणे, कपड्यांवरून अश्लील टिप्पणी करणे, तसेच मोबाईलमध्ये चित्रीकरण केल्याप्रकरणी स्वयंघोषित रील स्टार संतोष पंडित याच्याविरोधात पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना ३० मार्चला पुण्यातील टिळक रस्त्यावर घडली आहे.

पुण्यात गंगाधाम चौकात गादी कारखान्याला भीषण आग – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा निषेध करण्यासाठी टिळक रस्त्यावरील एसपी महाविद्यालयाजवळ एका संघटनेकडून आंदोलन करण्यात येत होते. त्यावेळी पत्रकार तरुणी आंदोलनाचे कव्हरेज करण्यासाठी त्याठिकाणी गेल्या होत्या. वार्तांकन सुरू असतानाच रीलस्टार संतोष पंडित याने त्याठिकाणी येऊन पत्रकारांवर संताप व्यक्त केला. अर्वाच्य भाषेत बोलून त्याने महिला पत्रकाराच्या कपड्यांवरून अश्लील टिप्पणी केली. तिच्याकडे अपमानास्पद नजरेने पाहत अश्लील हावभाव केले. त्याने मोबाईलद्वारे चित्रीकरण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

आंदोलनात सहभागी झालेल्या इतर महिलांकडेही संतोष पंडितने शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी संबंधित महिला पत्रकाराने दिलेल्या तक्रारीवरून पर्वती पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 75, 78, 352, 351(1) आणि 296 अंतर्गत पंडित विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सुभाष महाले करत आहे. घटनेमुळे पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×