Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

पुण्यात गंगाधाम चौकात गादी कारखान्याला भीषण आग

सुदैवाने कोणतीही जिवीत हानी नाही

marathinews24.com

पुणे – शहरातील गंगाधाम चौकातील असलेल्या गादीच्या कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. आगीत सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही. मात्र, प्रचंड नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियत्रंण मिळविले.

पुण्यात ट्रिपलसीट दुचाकीस्वार रडारवर – सविस्तर बातमी

गंगाधाम चौकात आईमाता मंदिराजवळ व्यावसायिक संजय बोरा यांचे १ हजार फुटामध्ये गोडाऊन आहे. गोडाऊनमध्ये त्यांनी तयार केलेल्या गाद्या ठेवलेल्या होत्या. त्यासोबतच इतर लागणारे साहित्य देखील होते. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास शॉर्ट सर्किट होऊन अचानक गोडाऊनमध्ये आग लागली. मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याचे दिसताच येथील कामगारांनी याची माहिती अग्निशमन दलाला दिली. गंगाधाम व कोंढवा अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत आगीने उग्र रूप धारण करत पुर्ण कारखान्याला विळखा घातला होता. जवानांनी पाण्याचा मारा केला. आगीवर काही वेळात नियत्रंण मिळविले. दरम्यान कापूस आणि कपडा असल्याने कुलींग देखील करण्यात आल्याचे अग्निशमन दलाचे अधिकारी कैलाश शिंदे यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×